पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात दहशतवाद्यांनी एका पोलिस स्टेशनला लक्ष करत हल्ला केला.या हल्ल्यात २३ सुरक्षा कर्मचार्यांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामधील डेरा इस्माईल खान जिल्ह्यात असणाऱ्या दरबान पोलिस स्टेशनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.डेरा इस्माईल खान जिल्हा आदिवासी बहुल दक्षिण वझिरीस्तान जिल्ह्याला लागून आहे. पोलिसांनी सांगितले की, आत्मघातकी हल्लेखोरांचे स्फोटकांनी भरलेले वाहन पोलीस ठाण्याच्या इमारतीत धडकले आणि त्यांनतर दहशतवाद्यांनी हल्ला केला.
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, सुरक्षा दल आणि हल्लेखोर यांच्यात झालेल्या गोळीबाराच्या दरम्यान, किमान तेवीस सुरक्षा कर्मचार्यांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.तसेच हल्ला करणारे सर्व दहशतवादी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले आहेत.हल्ल्यामुळे पोलीस ठाण्याचे छतही कोसळले आहे.घटनास्थळी अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा पाठवण्यात आला असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
हे ही वाचा:
काँग्रेस पक्ष देशात असताना ‘मनी हाईस्ट’ या काल्पनिक कथानकाची गरज आहे का?
बेंगळुरूच्या डॉक्टरांनी तब्बल १८ वर्षानंतर माणसाच्या डोक्यात अडकलेली गोळी काढली बाहेर!
निवडणूक आयोगाने तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांचे निलंबन घेतले मागे!
रुग्णालयाच्या शौचालयात फेकले बाळाला!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना डीआय खान रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरबन तहसील पूर्णपणे सील करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयांनी आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
तहरीक-ए-जिहाद पाकिस्तान नावाच्या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेने पाकिस्तानमध्ये अनेक मोठे हल्ले केले आहेत. तेहरीक-ए-जिहाद पाकिस्तानचे प्रवक्ते मुल्ला कासिम यांनी सांगितले की, हा आत्मघाती हल्ला होता. सध्या डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. तसेच सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.