कुख्यात गुंड आणि समाजवादी पार्टीचा माजी नेता अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ प्रयागराज इथे पोलिसांसमोर हत्या करण्यात आली. टांगे वाल्याचा मुलगा ते युपीचा डॉन अशी त्याची ओळख. अतिकचे नाव १०० हून अधिक वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये होते आणि त्याचा भाऊ अश्रफ तब्बल ५२ गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सामील असल्याचे बोलले जाते.
अतिकने १९८९, १९९१, १९९३, १९९६ आणि २००२ असे एकूण पाच वेळा आमदारकीची निवडणूक जिंकली तर २००४ मध्ये खासदार म्हणून निवडून आला. यानंतर २०१४ मध्येही अतिकने समाजवादी पक्षाच्या तिकिटावर सार्वत्रिक निवडणूक लढवली,पण त्याच्या हाती अपयश आले.
दरम्यान, अतिक आता आपल्या पश्चात कोट्यवधींची मालमत्ता सोडून गेला आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. अतीकच्या पत्नीकडे १७५० ग्रॅम सोने आणि ३८१० ग्रॅम चांदी आहे. अतिककडे असलेल्या या सोन्याच्या वस्तूंची सध्याची अंदाजित किंमत १.०७ कोटी आहे तर चांदीची किंमत २ लाख ९३ हजार रुपये आहे. तर कालांतराने ११,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता जप्त केली. २०१९ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आहे.
अतिकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम चकमकीत ठार होण्याच्या एक दिवस आधी ईडीने अतिक आणि त्याच्या जवळच्या साथीदारांच्या १५ ठिकाणांवर छापे टाकले, ज्यात ईडीला १०० हून अधिक बेकायदेशीर आणि बेनामी संपत्तीची कागदपत्रे सापडली आहेत. अतीकच्या नावावर डझनावारी बँक खाती आहेत. त्याने जे निवडणुकीसाठी प्रतिज्ञापत्र दिले त्यातील संपत्तीपेक्षाही ४०० पट अधिक संपत्ती त्याच्याकडे असल्याचे आढळले आहे.
याशिवाय लखनऊ आणि प्रयागराजमधील उच्चभ्रू भागात खरेदी केलेल्या मालमत्तांचा तपशीलही सापडला, जो अतिक किंवा त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर आहेत. याशिवाय लखनौ, मुंबई, दिल्लीतील अनेक व्यावसायिक आणि बांधकाम व्यावसायिकही अतिकच्या संपर्कात होते. ईडीने ८४.६८ लाख रुपये रोख, ६० लाख रुपये किमतीचे सोन्याच्या विटा, २.८५ कोटी रुपये किमतीचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने, ३० मोबाईल फोन, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि कॉम्प्युटरसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कागदपत्रे अतिकच्या जवळच्या नातेवाईकांकडून जप्त केली आहेत.
हे ही वाचा:
लंडनच्या खलिस्तानी समर्थकांविरोधात एनआयए करणार चौकशी
आमच्या पक्षाचे प्रवक्ते बनू नका! अजित पवारांनी संजय राऊतांना सुनावले
सीरियात मशरूम पिकवणाऱ्या ३१ शेतकऱ्यांची हत्या
चापेकरांच्या प्रखर राष्ट्रभक्ती आणि शौर्याचे स्मरण
अतिकने प्रयागराजच्या सिव्हिल लाइन्ससह सर्वात महागड्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता जबरदस्ती ताब्यात घेऊन कवडीमोल भावाने विकत घेतल्या. दरम्यान, प्रयागराजचे मोठे बिल्डर संजीव अग्रवाल आणि व्यापारी दीपक भार्गव यांच्यामार्फत शेल कंपन्यांच्या माध्यमातून करोडोचा काळा पैसा पांढरा करण्याचे कामही अतिक करत होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, युपीचे एडीजीपी प्रशांत कुमार यांनी असे सांगितले की, अतिक अहमद आणि त्यांच्या परिवारासंबंधित ११,६८४ करोडची संपत्ती सरकार कडून जप्त करण्यात आली असून घोषित केलेल्या संपत्तीचा यात उल्लेख नाही.
संपत्तीचा वारस कोण ?
कोट्यवधींच्या मालमत्तेचे वारसदार अतिकचे चार मुलं असणार आहेत. सध्या सर्व मालमत्ता पत्नी पाहत आहे.