सध्या देशात गाजते आहे ते बसप आमदार राजू पाल हत्येचा मुख्य साक्षीदार उमेश पालच्या हत्येचे प्रकरण. समाजवादी पक्षाचे माजी खासदार आणि माजी आमदार अतीक अहमद याने ही हत्या घडवून आणल्याचे समोर येते आहे. अतीक अहमद सध्या साबरमती तुरुंगात आहे.
२००५मध्ये राजू पालच्या झालेल्या हत्येचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या उमेश पालची हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. राजू पाल हा बहुजन समाज पार्टीचा आमदार होता. त्याच्या या हत्येची योजना अतिक अहमदचा भाऊ अश्रफ याने आखली. बरेली येथील तुरुंगात हा अश्रफ आहे. यासंदर्भात पोलिस आयुक्तांनी सांगितले की, ही सगळी योजना अश्रफच्या सांगण्यावरून मुस्लिम होस्टेलमध्ये रचली गेली. पण या खुनाचे आदेश अतीक अहमदने साबरमती तुरुंगातून दिले होते.
हे ही वाचा:
काश्मिरी हिंदू संजय शर्माला मारणाऱ्या दहशतवाद्याला घातले कंठस्नान
पंतप्रधान मोदींचे बंधू रुग्णालयात दाखल
कर्मभूमी वानखेडेवर सचिनचा पुतळा उभा राहणार
आज ‘रामन इफेक्ट’चा दिवस, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
राजू पाल याने अतीक अहमदच्या लहान भावाला उत्तर प्रदेशमधील निवडणुकीत पराभूत केले होते, त्यातूनच राजू पालची ही हत्या झाली. दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी उमेश पालच्या हत्येत सहभागी असलेल्या अरबाझला एन्काऊंटर करून मारण्यात आले. प्रयागराज येथील नेहरूपार्कमध्ये त्याला गोळ्या घातल्या गेल्या. अरबाझवर यापूर्वी ५० हजारांचे इनाम लावण्यात आले होते. अरबाझ हा बाईकवरून पळण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला मारले. त्याच्याकडे पिस्तुलही सापडले.