पत्नी आणि पुतण्यावर गोळी झाडून सहाय्यक पोलीस आयुक्तांची आत्महत्या

पुण्यातील धक्कदायक घटना

पत्नी आणि पुतण्यावर गोळी झाडून सहाय्यक पोलीस आयुक्तांची आत्महत्या

अमरावती पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहरातीत चतुश्रुंगी परिसरात मध्यरात्री ४ वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

भरत गायकवाड यांच्या पत्नी मोनी गायकवाड (वय ४४) आणि पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी गोळी झाडून खून करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. तर भरत गायकवाड यांनी त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. या घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

भरत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते, तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते. ते सुट्टीसाठी पुण्यातल्या घरी आले होते. त्यांनी पत्नी आणि पुतण्याची हत्या केल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

मणिपूर: विवस्त्र धिंडीचा व्हिडीओ काढण्यासाठी वापरण्यात आलेला फोन पोलिसांच्या हाती

इराणकडून स्वीडन आणि डेन्मार्कमधील उत्पादनांवर बहिष्काराचे आवाहन

मणिपूरमधील हिंसाचार चिघळला; दंगलखोरांनी शाळा पेटवली

सात्विक-चिरागला वर्षातील तिसरे विजेतेपद !

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट सापडली नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून शहरात खळबळ उडाली आहे. कुटुंबात काही वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Exit mobile version