सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकांची मालमत्ता ईडीकडून जप्त, ‘या’ प्रकरणात केली कारवाई

सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक जवरेह सोली पुनावाला यांच्यावर ईडीची कारवाई

सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकांची मालमत्ता ईडीकडून जप्त, ‘या’ प्रकरणात केली कारवाई

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक जवरेह सोली पुनावाला यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. पनामा पेपर प्रकरणात ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. मुंबईतील सीजे हाऊसमधील ४१.६४ कोटी रुपये किंमतीच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. फेमा (FEMA) कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ‘

एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, सक्तवसुली संचालनालयाने पनामा पेपर्स प्रकरणात संशयास्पद व्यवहार केल्याप्रकरणी पूनावाला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात तपास केला होता. पूनावाला यांचे काही व्यवहार संशयास्पद आढळले होते. याप्रकरणी ईडीने त्यांच्यावर कारवाई केली असून त्यांच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीने फेमा कायद्यातील तरतुदींनुसार, पूनावाला यांची मुंबईच्या वरळी येथील सीजे हाऊसमधून ४१.६४ कोटी रुपयांच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या. या प्रकरणाचा अधिक तपास ईडीकडून केला जात आहे.

पनामा पेपर्स काय आहे?

अमेरिकेजवळील पनामा देशात पैशाचा फेरफार करण्यासाठी जगभरातील अनेक उद्योगपतींसह सेलेब्रिटींनी बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या. या कंपन्यांचा वापर बेहिशेबी पैसा लपवणे, कर चुकवणे अशा कारणांसाठी केला गेला. जगभरातील शोधपत्रकारांनी एकत्र येत पनामातील मोझॅक फॉन्सेका या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची लाखो कागदपत्रे उजेडात आणली. २०१६ साली उघड झालेल्या कागदपत्रांत जगातील अनेक मोठ्या व्यक्तींची नावे समोर आली. ज्यामध्ये ५०० भारतीयांचाही समावेश होता.

हे ही वाचा:

केदार शिंदेंना ‘केरळ स्टोरी’ची पोटदुखी का?

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

मेक इन इंडियाची भरारी!! पहिले एअरबस C295 भारताच्या ताफ्यात येणार

सागरी जगभ्रमणासाठी आता मोहिमेवर निघणार नौदलाची महिला अधिकारी

भारत सरकाकडून याबाबतची चौकशी करण्यासाठी मल्टी एजन्सी गृपची स्थापना करण्यात आली. ज्याद्वारे उघड झालेल्या गैरव्यवहारातील ४२६ व्यक्तींची चौकशी सुरू आहे. पनामा पेपर्स प्रकरणात नाव आल्यामुळेच पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पंतप्रधानपद सोडावे लागले होते.

Exit mobile version