34 C
Mumbai
Monday, April 7, 2025
घरक्राईमनामाहिजबुल मुजाहिदीनच्या पाच दहशतवाद्यांच्या मालमत्ता जप्त

हिजबुल मुजाहिदीनच्या पाच दहशतवाद्यांच्या मालमत्ता जप्त

जम्मू- काश्मीर पोलिसांकडून कारवाई

Google News Follow

Related

जम्मू- काश्मीर खोऱ्यात दहशतवादाविरुद्ध कारवाई सुरू असून भारतीय लष्कर आणि जम्मू- काश्मीर पोलिसांकडून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. दरम्यान, एका मोठ्या कारवाईत, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी रामबन जिल्ह्यातील गुल भागात हिजबुल मुजाहिदीनच्या पाच दहशतवाद्यांच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) राहून भारतविरोधी कारवाया करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पाच दहशतवादी शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेण्यासाठी आणि भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पीओकेमध्ये गेले होते. गुप्तचर संस्थांनुसार, दहशतवादी त्यांच्या स्थावर मालमत्ता विकण्याची योजना आखत होते आणि ते या पैशाचा वापर दहशतवादासाठी आणि स्थानिकांना भडकवण्यासाठी करणार होते, अशी माहिती मिळाली होती.

जप्त केलेल्या मालमत्ता सांगलदान येथील सेराज दिन (वय ४८ वर्षे), दलवाह येथील रियाज अहमद (वय ४५ वर्षे), बंज भीमदस्सा येथील फारूक अहमद (वय ४६ वर्षे), मोईला येथील मोहम्मद अशरफ (वय ५० वर्षे) आणि मुश्ताक अहमद (वय ४७ वर्षे) यांच्या आहेत. दहशतवादाविरुद्ध कडक कारवाईचा एक भाग म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गुलच्या सेक्शन ऑफिसरने जारी केलेल्या आदेशानुसार, जम्मू आणि काश्मीर पोलिस किंवा इतर अधिकृत एजन्सींनी परवानगी दिल्याशिवाय जप्त केलेल्या मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा इतर कोणताही व्यवहार प्रतिबंधित असेल.

हे ही वाचा : 

संतोष देशमुख प्रकरण: वाल्मिक कराडंच मुख्य सूत्रधार, खंडणीसाठी केली हत्या

त्रिपुरा येथून तीन भारतीय दलालांसह १३ घुसखोर बांगलादेशींना अटक

संजय राऊत यांनी पुन्हा दाखवले स्वबळ; मविआला डच्चू

प्रयागराजमध्ये हिंदू व्यावसायिकाच्या घराबाहेर आढळले गायीचे शिर

जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी त्यांच्या मालमत्ता विकून दहशतवादासाठी निधी उभारण्याची योजना आखत होते. ते म्हणाले, “गुल भागातून या पाच दहशतवाद्यांच्या स्थावर मालमत्तेची जप्ती ही दहशतवाद्यांना वित्तपुरवठा करणाऱ्या नेटवर्कचा नाश करण्याच्या आणि या प्रदेशात दहशतवादाचे पुनरागमन रोखण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल आहे. यातून एक मजबूत संदेश जातो की पीओकेमध्ये बसलेले दहशतवादी पुन्हा जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देऊ शकत नाहीत. या जप्तीचा थेट परिणाम हिजबुल मुजाहिदीनच्या निधीवर होईल, ज्यामुळे ते या प्रदेशात आपला प्रभाव पुन्हा स्थापित करू शकणार नाहीत.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
240,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा