मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.दक्षिण मणिपूरमधील एआर बटालियन परिसरात ही घटना घडली. जवानाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात सहा जवान जखमी झाले आहेत.या घटनेनंतर गोळ्या झाडणाऱ्या जवानाने स्वतःवर देखील गोळी झाडून आत्महत्या केली.यासंदर्भात मणिपूर पोलिसांकडून एक निवेदन जारी करण्यात आले.सर्व जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती ठीक असल्याचे मणिपूर पोलिसांनी सांगितले आहे.
मणिपूर पोलिसांनी सांगितले की, बुधवारी दक्षिण मणिपूरमधील आसाम रायफल्स (एआर) बटालियन परिसरात गोळीबाराची ही घटना घडली.आसाम रायफल्सच्या एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला आणि स्वतःवर देखील गोळी झाडली.या हल्लयात सहा जवान जखमी झाले.सर्व जवानांना चुराचांदपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे मणिपूर पोलिसांकडून सांगण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, मृत जवान कुकी समाजाचा असल्याचे सांगण्यात आले आहे.जखमी झालेल्या जवानांपैकी एकही जवान मणिपूरचा नसल्याचे मणिपूर पोलिसांनी सांगितले आहे.या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर करून जदयू, राजद पक्षांच्या मुद्द्यातील हवा काढली
मागासवर्गीयांसाठी लढणारे, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न
संरक्षण प्रकल्पांमध्ये खर्चवाढ अन् विलंब नको!
‘राम मंदिर उद्घाटन माझ्यासाठी अध्यात्मिकता; राजकारण नव्हे’
From PRO of IG AR (s):
There has been an incident of firing by an Assam Rifles Jawan in an ASSAM RIFLES BATTALION deployed close to the Indo – Myanmar border in South Manipur.
One Assam Rifles Jawan opened fire on his colleagues injuring six of them (all injured are…
— Manipur Police (@manipur_police) January 24, 2024
तसेच अफवांपासून दूर राहण्याच्या सूचना मणिपूर पोलिसांनी दिल्या आहेत. पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे की, मणिपूरमध्ये सुरु असलेल्या जातीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही संभाव्य अफवा दूर करण्यासाठी आणि कोणतीही चर्चा टाळण्यासाठी घटनेची माहिती देणे महत्वाचे आहे.या घटनेला सध्या सुरु असलेल्या संघर्षाशी जोडता काम नये, अशा सूचना मणिपूर पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.