आसाम आयईडी प्रकरण: एनआयएकडून उल्फा (आय) च्या कार्यकर्त्याला अटक

बंगळूरूमधून आवळल्या मुसक्या

आसाम आयईडी प्रकरण: एनआयएकडून उल्फा (आय) च्या कार्यकर्त्याला अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने आसाममध्ये अनेक ठिकाणी आयईडी पेरण्याशी संबंधित बंदी असलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम- इंडिपेंडेंट (ULFA- I) प्रकरणात एका प्रमुख आरोपीला अटक केली आहे. भारतातील स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाच्या विरोधात सशस्त्र निषेधाचा एक भाग म्हणून ही आयईडी पेरण्यात आली होती. एनआयएने म्हटले आहे की गिरीश बरुआ उर्फ गौतम बरुआ याला बेंगळुरूच्या बाहेरील भागातून पकडण्यात आले. एनआयएने गौतम याला अटक केली आहे. बॉम्ब प्लांटिंग प्रकरणात एनआयएने केलेली ही पहिली अटक केली आहे.

हे ही वाचा : 

इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या हवाई दलाचा कमांडर ठार

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला?, समितीचा अहवाल आला समोर!

आरोपीने पोलिसांवर गोळी झाडली तर आमचे पोलीस टाळ्या वाजवणार का?

हिमाचलचे मंत्री विक्रमादित्यांना काँग्रेसने फटकारले

एनआयएने सांगितले आहे की, आरोपी हा उल्फा (I) कार्यकर्त्यांच्या गटाचा एक भाग असून त्याने संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार आसाममधील उत्तर लखीमपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी आयईडी ठेवले होते. बरुआला अटक करून बुधवारी बेंगळुरू येथील विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड आणि एनआयए विशेष न्यायालय आसाम गुवाहाटीसमोर हजर करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. भारतातील स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाच्या विरोधात सशस्त्र निषेधाचा एक भाग म्हणून प्रतिबंधित दहशतवादी संघटना उल्फा (आय) द्वारे आसाममध्ये स्फोटक उपकरणे पेरल्याप्रकरणी सप्टेंबरमध्ये तपास संस्थेने गुन्हा दाखल केला होता.

Exit mobile version