अमित शहांचा बनावट व्हिडिओ: आसाम काँग्रेसच्या वॉर रूमचे समन्वयक रीतम सिंग अटकेत

अमित शहांचा बनावट व्हिडिओ: आसाम काँग्रेसच्या वॉर रूमचे समन्वयक रीतम सिंग अटकेत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बनावट व्हिडिओच्या संदर्भात आसाम काँग्रेसचे ‘वॉर रूम कोऑर्डिनेटर’ रीतम सिंग यांना अटक करण्यात आली. ‘आसाम पोलिसांनी माननीय गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश असलेल्या बनावट व्हिडिओच्या संदर्भात रीतम सिंग नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे,’ अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे. ‘एक्स’वरील ‘व्हॉइस ऑफ आसाम’ नावाच्या व्यक्तीने सिंग यांच्या अटकेची बातमी सर्वप्रथम दिली होती.

दीपक दास नावाच्या एका व्यक्तीने पानबाजार पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी सिंगच्या ताब्यातून दोन मोबाईल फोन आणि एक वैयक्तिक लॅपटॉप जप्त केला आहे. ‘केंद्रीय गृहमंत्र्यांवरील विकृत आणि प्रेरित ट्विट प्रसारित केल्याच्या तक्रारीच्या आधारे, रितम सिंगला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून दोन मोबाईल फोन आणि एक वैयक्तिक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे,’ असे आसाम पोलिसांनी सांगितले.

‘भाजप सत्तेत आल्यास भारतातील एससी-एसटी-ओबीसी आरक्षण संपवेल. हे निव्वळ ब्राह्मणवादी वर्चस्व असून डॉ. आंबेडकरांच्या राज्यघटनेचा मृत्यू आहे. त्यांना भारताची संपूर्ण संपत्ती अंबानी आणि अदानींना द्यायची आहे. त्यांना सर्व जागा आणि नोकऱ्या तीन टक्के असणाऱ्या ब्राह्मणांना द्यायच्या आहेत,’ असे या समन्वयकाने २७ एप्रिल रोजी शहा यांच्या बनावट व्हिडीओसह पोस्ट केले होते.

तथापि, शहा यांचा व्हिडिओ चुकीचा होता. ‘मी हे सांगू इच्छितो की जर भाजपने सरकार बनवले तर मुस्लिम आरक्षण संपुष्टात येईल. हे अधिकार एससी, एसटी आणि ओबीसींचे आहेत आणि ते मुस्लिम आरक्षण रद्द करून त्यांना दिले जातील,’ असे शाह म्हणाले होते.

हे ही वाचा:

मीरारोड लव्ह जिहाद प्रकरण; आरोपी मोहसीन शेखला अटक!

आमच्याविरुद्ध लढू न शकणारे आमचे फेक व्हीडिओ पसरवत आहेत!

अमित शहांच्या फेक व्हीडिओप्रकरणी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डीना समन्स

नागपूर, जयपूर आणि गोवा विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी!

काँग्रेस सदस्याने या पोस्टमध्ये पंतप्रधानांविरोधात अपमानास्पद शब्दही वापरले. सोशल मीडियावर भाजप आणि त्यांच्या समर्थकांविरोधात धमकी आणि अपमानजनक पोस्ट करण्यासाठी रीतम सिंग कुप्रसिद्ध आहेत. अलीकडील एक्स पोस्टमध्ये, सिंग यांना भाजपचे समर्थन करणारे सर्व सोशल मीडिया वापरकर्त्यांना दोन महिन्यांत तुरुंगात पाठवायचे होते. गंमत म्हणजे, सिंह यांना बदला घ्यायचा होता आणि “मोदी अँड कंपनी” ला तुरुंगात टाकायचे होते, तथापि, त्यांनी ‘उजव्या विचारसरणी’वर लावलेल्या त्याच आरोपांमुळे त्यांना अटक झाली.

Exit mobile version