उत्तर प्रदेशातील बरेली येथे लव्ह जिहादची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुस्लिम पुरूषाने एका दलित हिंदू तरुणीला त्याची ओळख खोटी सांगून तिचे लैंगिक शोषण केल्याची बाब उघडकीस आली आहे. आरोपी आसिफ कुरेशीने स्वतःला आशिष साहू नावाने ओळख करून देऊन महिलेची दिशाभूल केली. कुरेशी स्वतःला हिंदू म्हणून दाखवण्यासाठी टिळक लावायचा. पीडितेचे लैंगिक शोषण करण्यासाठी त्याने आपली ओळख लपवली.
माहितीनुसार, आसिफ याने गुरुवार, ३ एप्रिल रोजी फरीदपूर येथील राजधानी हॉटेलमध्ये एक खोली बुक केली. तो पीडितेला हॉटेलच्या खोलीत घेऊन गेला जिथे त्याने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिचे लैंगिक शोषण केले. दरम्यान, तिला त्याची ओळख कळली आणि तिने घटनेची माहिती तिच्या कुटुंबाला दिली. पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना याची माहिती देत कुरेशीविरुद्ध फरीदपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कुरेशीला अटक केली आहे.
फरीदपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हरेंद्र सिंह यांनी सांगितले की, आसिफ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हॉटेलच्या खोलीतून पुरावे गोळा करण्यासाठी तात्काळ फॉरेन्सिक टीम पाठवली आणि पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे.
मठिया येथील रहिवासी आसिफ हा पीडित तरुणीचा पाठलाग करत असे. ही तरुणी भुता येथील रहिवासी आहे. पीडित मुलगी फरीदपूर येथील एका महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे. कुरेशी एका स्थानिक वकिलाकडे मुन्शी (सहाय्यक) म्हणून काम करत असल्याची माहिती आहे. कुरेशीने पीडितेला बनावट ओळख दाखवून जाळ्यात अडकवले. त्याने पीडितेला हिंदू असल्याचे पटवून देण्यासाठी आशिष साहू हे नाव लिहिलेले बनावट आधार कार्डही बनवले. घटनेच्या दिवशी कुरेशीने हॉटेल रूम बुक करण्यासाठी त्याच आधार कार्डचा वापर केला.
हे ही वाचा :
कोलंबोमध्येही फक्त मोदी मोदी आणि मोदीचं…!
मोदींनी अनोख्या भेटीतून थायलंड शाही दाम्पत्याशी जोडले सांस्कृतिक नाते
“कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने करा, त्याला ब्रह्मवाक्य समजू नका”
Bigg Boss 18 : देशातील पहिल्या एआय सुपरस्टारचे बिग बॉस १८ मध्ये स्थान निश्चित!
घटनेची माहिती मिळताच काही हिंदू संघटनांच्या सदस्यांनी पोलिस ठाण्यात पोहचून निषेध व्यक्त केला. त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ च्या तरतुदी देखील लागू केल्या आहेत.