‘अशोक गेहलोत, पोलिसांनी सुरक्षा पुरवली नाही’

करणी सेनाप्रमुखांच्या पत्नीची तक्रार

‘अशोक गेहलोत, पोलिसांनी सुरक्षा पुरवली नाही’

करणी सेनाप्रमुख सुखदेव सिंह गोगामेदी यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असूनही राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राज्याच्या पोलिस प्रमुखांनी त्यांना संरक्षण दिले नाही, असा आरोप सुखदेवसिंह यांच्या पत्नीने केला आहे.

करणीसेनाप्रमुखांची जयपूरमधील त्यांच्याच राहत्या घरी हत्या झाल्यानंतर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत त्यांच्या पत्नीने हा आरोप केला आहे. सुखदेवसिंह गोगामेदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याबद्दलची माहिती देणारे पत्र मार्च महिन्यातच राजस्थानचे पोलिस महासंचालक उमेश मिश्रा यांना पाठवण्यात आले होते, असे गोगामेदी यांच्या पत्नीने केलेल्या पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले होते. गोगामेदी यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असूनही गेहलोत आणि मिश्रा यांनी त्यांना पोलिस संरक्षण दिले नाही, असा आरोप त्यांच्या पत्नीने केला.

हे ही वाचा:

‘पूरपरिस्थिती असूनही मुंबईची न्यायालये काम थांबवत नाहीत’

हमासच्या नेत्याने पाकिस्तानला शूर म्हणत इस्रायलचे हल्ले थांबवण्यासाठी केली मागणी!

युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत ‘गरब्याची’ नोंद!

पाकव्याप्त कश्मीरमधील विस्थापितांसाठी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत एक जागा राखीव

पोलिसांनी मारेकऱ्यांची ओळख पटवली आहे. त्यातील एकाचे नाव रोहित राठोड तर दुसऱ्याचे नितीन फौजी असे आहे. नवीन शेखावत, रोहित राठोड आणि नितीन फौजी हे करणीसेना प्रमुखांना लग्नाची पत्रिका देण्याचे निमित्त साधून त्यांच्या घरात घुसले होते. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे मानले जात आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगचा गुंड असलेल्या रोहित गोडारा याचाही या जमिनीच्या वादात सहभाग होता. गोडारा याने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

Exit mobile version