एका वक्तव्यावरून आशीष शेलार यांच्याविरोधात महापौर किशोरी पेडणेकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर शेलार यांची १ लाखाच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत हा गुन्हा रद्द करण्यासाठी याचिक केली आहे.
आशीष शेलार यांनी वरळीतील गॅस सिलिंडर स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबावर उपचारात झालेल्या दिरंगाईवरून महापौरांवर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यातील एका शब्दावरून महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही तक्रार दाखल केली होती.
‘जे प्रकरण न्यायालयात उभेच राहू शकत नाही, ते जाणीवपूर्वक उभे करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होत आहे, असे आशीष शेलार यांनी म्हटले आहे. त्यामुळे खोटा का होईना गुन्हा त्यांनी काल दाखल केला त्याबद्दल मी जामीन घेतला. कायदेशीर प्रक्रियेतून मी खरे काय ते उघड करीनच. पण यांना पुन्हा सांगू इच्छितो की, आम्ही भाजपातील सर्व नेते, कार्यकर्ते शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाविरोधात संघर्ष तीव्र करु. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलात तर , तुमची कुकृत्य जनतेसमोर उघड केली जातील’, असा इशारा शेलार यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला दिलाय.
हे ही वाचा:
दिल्लीतील रोहिणी कोर्टात स्फोट, एक जखमी
महाराष्ट्र भाजपा सोशल मीडिया सेलच्या संयोजक पदी प्रकाश गाडे
कोण आहेत जर्मनीचे नवे चॅन्सेलर?
आशिष शेलारांना शांत करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न?
वरळीतील गॅस सिलिंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिथे झालेल्या दिरंगाईमुळे चार महिन्यांचे बाळ व नंतर त्याचे आईवडील दगावले, असा आरोप केला गेला. त्यावरून आशीष शेलार यांनी महापौरांना लक्ष्य केले होते. पण त्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी शेलार यांच्या वक्तव्याला लक्ष्य करत या प्रश्नापासून इतरत्र लक्ष वळविण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप झाला.