जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू पाच दिवसांच्या पॅरोलवर बाहेर

वैद्यकीय कारणासाठी उच्च न्यायालयाकडून पॅरोल मंजुर

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू पाच दिवसांच्या पॅरोलवर बाहेर

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू पाच दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला आहे. तब्बल ११ वर्षांनंतर मंगळवारी जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून आसाराम बापू बाहेर आला. त्याला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील रुग्णालयात हृदययाच्या संबंधित उपचारासाठी आणण्यात आले आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने बापूला उपचार घेण्याची परवानगी दिल्यानंतर दोन आठवड्यांनंतर त्याला आयुर्वेदिक रुग्णालयात आणण्यात आले.

राजस्थान उच्च न्यायालयाने १३ ऑगस्ट रोजी आसाराम बापूला सात दिवसांच्या पोलीस कोठडीत महाराष्ट्रातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली होती. पॅरोल मंजूर करताना उच्च न्यायालयाने त्याला काही अटी घातल्या होत्या. आसारामसोबत प्रवासात चार पोलीस आणि दोन अटेंडंट ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यांना पुण्यातील एका खासगी कॉटेजमध्ये ठेवण्यात येणार असून उपचार, वाहतूक आणि पोलिस बंदोबस्ताचा संपूर्ण खर्च त्यांना करावा लागणार आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, २०१३ च्या सप्टेंबर महिन्यात अटक करण्यात आलेल्या (८३ वर्षीय) आसारामला मंगळवारी रात्री ८ वाजता खोपोली येथील आयुर्वेदिक रुग्णालयाच्या बहुविद्याशाखीय कार्डियाक केअर क्लिनिकमध्ये पूर्ण पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. पुढील सात दिवस बापूवर हृदयविकारावर रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. सुरक्षेसाठी रूग्‍णालयात रायगड पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

बंगाल बंद: भाजप नेत्याच्या गाडीवर बॉम्ब, गोळीबाराची घटना !

युपीचे नवे सोशल मिडिया धोरण, देशविरोधी पोस्ट केल्यास ‘जन्मठेप’

अरुणाचल प्रदेशात लष्कराचा ट्रक दरीत कोसळून अपघात; तीन जवान हुतात्मा

मुडा घोटाळ्यानंतर आणखी एक जमीन घोटाळा !

गेल्या ११ वर्षांपासून आसाराम बापू लैंगिक अत्याचार आणि शोषणाच्या प्रकरणात शिक्षा भोगत आहे. आसारामने याआधी अनेकदा पॅरोल मिळावा म्हणून अर्ज केला होता. मात्र, त्याला न्यायालयाने पॅरोल मंजूर केला नाही. यावेळी पहिल्यांदाच उपचारांसाठी पॅरोल मागितला गेला आहे. यानंतर न्यायाधीश पुष्प्रेंद भाटी आणि न्यायाधीश मुन्नारी लक्ष्मण यांच्या खंडपीठाने जोधपूरच्या एम्स रुग्णालयाने दिलेल्या अहवालानंतर हा पॅरोल मंजूर केला आहे.

Exit mobile version