बलात्कारी आसाराम बापूला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

पीडितेला ५० हजारांची भरपाई देण्याचे आदेश

बलात्कारी आसाराम बापूला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला शिक्षा जाहीर झाली आहे. गुजरातच्या गांधीनगर सत्र न्यायालयाने आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दोन बहिणींवर बलात्कार केल्या प्रकरणी २०१३मध्ये आसाराम बापू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अहमदाबादमधील मोटेरा येथील आश्रमात आसाराम बापूने २००१ ते २००६ दरम्यान महिला शिष्यांवर अनेकदा बलात्कार केला.

गुजरातमधील गांधीनगर न्यायालयाने सोमवारी आसाराम बापूला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले होते. त्यानंतर मंगळवारी न्यायालयाने या प्रकरणी शिक्षा जाहीर केली. यासोबतच न्यायालयाने पीडितेला ५० हजारांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. याआधी विशेष सरकारी वकील आर सी कोडेकर यांनी आसारामला जन्मठेप आणि मोठा दंड ठोठावण्याची विनंती न्यायालयाला केली होती. पीडितेला नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली होती.

विशेष सरकारी वकील आर सी कोडेकर यांच्या म्हणण्यानुसार, पीडितेने सुरत पोलिसांकडे गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा २०१३ मध्ये अहमदाबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. चांदखेडा पोलीस ठाण्यात आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साई यांच्यासह ८ जणांविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा:

दिलासा..चारधाम यात्रेसाठी जोशीमठ सुरक्षित

अनिल परब यांचे कार्यालय तोडले, किरीट सोमय्या भेट देणार

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्या जगाचे लक्ष

…अदानींमुळे म्हणे LIC बुडाली!

आसाराम बापू सध्या जोधपूर तुरुंगात आहेत. त्याचबरोबर नारायण साईविरोधात सुरत कोर्टात वेगळा खटला सुरू आहे. दोन बहिणींनी आसाराम आणि त्याच्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली होती, ज्यात आसाराम आणि त्याच्या मुलाद्वारे चालवल्या जाणाऱ्या मोटेरा आश्रमात १९९७ ते२००६ दरम्यान बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. लहान बहिणीने नारायण साई आणि मोठ्या बहिणीने आसारामविरोधात तक्रार दाखल केली होती.

Exit mobile version