ईदसाठी भिवंडीतले कत्तलखाने पुन्हा सक्रिय? दोन गायी चोरल्याची घटना

ईदसाठी भिवंडीतले कत्तलखाने पुन्हा सक्रिय? दोन गायी चोरल्याची घटना

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या शहरातून गाय चोरीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. बकरी ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच या गाय चोरीच्या घटना घडताना दिसत आहेत. त्यामुळे भिवंडीतील कत्तलखाने पुन्हा सक्रिय झाल्येत का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात आनगाव जवळील कवाड या ठिकाणी गायींची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. कवाडचे रहिवासी असणाऱ्या मंदार लेले यांच्या राहत्या घरातून त्यांच्या दोन गाई चोरीला गेल्या आहेत. या दोन्ही गायी गिर जमातीचा होत्या. तर चोरीला गेलेल्या या दोन्ही गायी गाभण होत्या.

९ जुलैच्या रात्री ही चोरीची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री १ वाजता मंदार हे त्यांच्या गोठ्यात होते. त्यावेळी त्यांच्या सर्व गायी आणि इतर जनावरे ही जागेवरच होती. त्यानंतर मंदार झोपायला घरी गेले आणि सकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे गोठ्यात आले. पण तेव्हा त्यांच्या दोन गायी जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. आजूबाजूच्या परिसरात त्यांनी आपल्या या दोन गायींचा शोध घेतला असता त्यांना आपल्या गायी सापडल्या नाहीत. त्यामुळे आपल्या गाई चोरीला गेल्याची त्यांची खात्री पटली आणि लगेचच त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन गाठून या प्रकरणात फिर्याद नोंदवली आहे. तर या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून एका स्कॉर्पिओ गाडीत कोंबून या दोन गायी चोरल्याचे समजते.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशात ‘चप्पा चप्पा भाजपा’…ब्लॉक अध्यक्ष निवडणुकीत घवघवीत विजय

नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू

अखेर मेस्सी जिंकला!

बैलगाडीलाही पेलवेना काँग्रेसचा भार

दरम्यान बकरी ईद काही दिवसांवर आलेली असतानाच ही चोरीची घटना घडल्यामुळे कत्तलीसाठी या गायी चोरण्यात आल्या का? असा सवाल उपस्थित होत आहे. तर भिवंडीतील कत्तलखाने पुन्हा सुरु झाले का? हा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील या विषयात ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात खरोखरच मोगलाई आली आहे असे भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर खाटकांना गोंजारणारे सत्तेवर बसल्येत असा हल्लाबोल भातखळकर यांनी केला आहे.

Exit mobile version