30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामाआर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला; आर्थर रोड तुरुंगात रवानगी

आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला; आर्थर रोड तुरुंगात रवानगी

Google News Follow

Related

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळणार का यासंदर्भात सकाळपासून जी चर्चा सुरू होती, तिला अखेर पूर्णविराम मिळाला असून त्याला जामीन नाकारण्यात आला आहे. त्यामुळे आता त्याला आर्थर रोड तुरुंगात पाठविण्यात आले आहे.

महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने शुक्रवारी म्हटले की, आर्यन खान यांची जामीन याचिका न्यायालयात टिकण्यायोग्य नाही. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोशी सहमती दाखवत सांगितले आहे की, ड्रग्स जप्त केल्यामुळे सत्र न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करणे आवश्यक आहे.

न्यायालयाने अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या अन्य दोन आरोपींचे जामीन अर्जही फेटाळले आहे. या तिघांनाही आता दिलासा मिळवण्यासाठी सत्र न्यायालयात जावे लागेल.

गेल्या आठवड्यात मुंबई किनारपट्टीवरील क्रूझ जहाजावरील ड्रग संबंधित प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ११ ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि इतर सहा आरोपींची पुढील कोठडी मागितली होती.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ जहाजावरील ड्रग्ज जप्तीशी संबंधित प्रकरणात इतर सात आरोपींसह जामिनासाठी मुंबईतील एस्प्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आले. खान आणि इतर दोघे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) ताब्यात आहेत.

त्याआधी, क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला शाहरुख खान पुत्र आर्यन खान याच्यासह ३ जणांना एनसीबीने अटक केली. एनडीपीएस ऍक्टच्या ८सी, २० बी, २७ आणि ३५ या भारतीय दंड विधान कलमाखाली आर्यन आणि इतर दोघांना ही अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

‘ड्रग्ज माफियांची सुपारी घेणाऱ्यांचे थोबाड फोडणारा निर्णय’

मोदी-किशिदा चर्चेनंतर भारत-जपान संबंधांत हा होणार बदल?

६८ वर्षांनी एअर इंडिया टाटांकडे

चीनची पुन्हा आगळीक; तवांग क्षेत्रात केली घुसखोरी

इतर ४ जणांची चौकशी सुरू असून त्यांना देखील अटक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रानी दिली होती. शेवटी त्यांनाही अटक करण्यात आली आहे. आर्यन याच्याकडे सापडलेल्या ड्रग्सबाबत त्याने एनसीबीकडे कबुली दिली असल्याचे समजते. त्याच्याकडे सापडलेले ड्रग्स हे सेवन करण्यासाठी आणले असल्याची माहिती समोर आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा