मुंबईच्या विशेष न्यायालयाने बुधवारी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले आहेत.
आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट आणि मॉडेल मुनमुन धामेचासह सात जणांना ३ ऑक्टोबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली. आर्यन सध्या मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात आहे. कारण त्याला २ ऑक्टोबर रोजी मुंबई किनाऱ्यावरील क्रूझ जहाजातून ड्रग्ज जप्त केल्यानंतर एनसीबीने अटक केली होती.
१९ ऑक्टोबर रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग यांनी एनसीबीची बाजू मांडताना युवकांमध्ये ड्रग्जच्या सेवना चा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे म्हटले. न्यायालयापुढे ठेवलेले पुरावे स्पष्टपणे दर्शवतात की तो गेल्या काही वर्षांपासून निषिद्ध पदार्थांचे नियमित सेवन करत आहे.
हे ही वाचा:
आर्यन खानचे काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी
सहकारी साखर कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी
बापरे! डॉक्टरांनी ‘किडनी स्टोन’ ऐवजी ‘किडनी’च काढली
आर्यनचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील अमित देसाई म्हणाले की,आर्यनला जामीन मंजूर केल्यास त्याच्या तपासात कशाप्रकारे अडथळा येईल यासंबंधी कोणतीही सामग्री एनसीबीने सादर केली नाही. एनसीबीने ज्या क्रूझ पार्टीवर छापा टाकण्यात आला त्याचे कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ किंवा ऑडिओ पुरावे सादर केलेले नाहीत. हा सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आपला आदेश राखून ठेवला.