आर्यन खानची आता होणार सुटका

आर्यन खानची आता होणार सुटका

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची आज अखेर सुटका होणार आहे. गुरुवारी जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी त्याची जेलमधून अखेर सुटका होणार आहे. तब्बल २६ दिवसांनंतर आर्यन खानला जामीन मंजूर झाला. जामीन मिळाला मात्र, कोर्टाची ऑर्डर मिळाली नसल्याने आर्यनला कालची आणखी एक रात्र तुरुंगात काढावी लागली.

त्यानंतर आज सकाळी साडे पाच वाजता आर्थर रोड जेलची जामीन पत्रपेटी उघडली गेली. त्यानंतर जामीन अर्जाची प्रत तुरुंगातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. सकाळी ९ वाजेनंतर आर्यन खानच्या सुटकेची प्रक्रिया सुरु होईल अशी माहिती आहे.

या संपूर्ण प्रक्रियेला एक ते दोन तास लागण्याची शक्यता असल्याने आर्यनला १० ते १२ वाजताच्या दरम्यान सोडण्यात येईल. शाहरुख खान हा स्वतः आर्यन खानला आणायला आर्थर रोड कारागृहाकडे रवाना झाला आहे.

हे ही वाचा:

‘त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढे त्याने कमावले आहे’

पोलिस कल्याण निधीतून पोलिसांना ७५० रुपयांची भरगच्च ‘दिवाळी भेट’

दिल्ली सीमेवर तणाव निवळला?

उत्तरप्रदेशात या सात पक्षांची भाजपाला साथ

आर्यनला गुरुवारी जामीन मिळाल्यानंतर काल अभिनेत्री जुही चावला संध्याकाळी चारच्या सुमारास सेशन न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्यांनी आर्यन खानच्या जामीनावर गॅरेंटर म्हणून सही केली. यावेळी त्यांच्याबरोबर सतीश मानेशिंदे देखील न्यायालयात दाखल झाले होते. न्यायालयात सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडली. परंतु जेलमधून सुटका होण्याबाबतचे देखील काही महत्त्वाचे नियम असतात. आर्यनच्या जामीनाची सर्व कागदपत्रे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ऑर्थर रोड जेलच्या पेटीपत्रात पोहचणं आवश्यक होतं. कारण ही पेटी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंतच उघडी असते. मात्र उशीर झाल्यामुळे कालची रात्रही आर्यनला तुरुंगातच काढावी लागली होती.

Exit mobile version