23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाआर्यन खानसह आठ जणांना ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी

आर्यन खानसह आठ जणांना ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी

Google News Follow

Related

क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या शाहरुख खान पुत्र आर्यन खानसह ८ जणांना ७ ऑक्टोबरपर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. किल्ला कोर्टात आर्यन खानला आणण्यात आले. तिथे सुनावणी सुरू होती.

एनसीबीने तशी मागणी न्यायालयाकडे केली होती. आर्यन खानकडून बरीच माहिती मिळू शकते हे लक्षात घेता एनसीबीने ही मागणी केली आहे.

एनसीबीचे वकील अनिल सिंग यांनी न्यायालयात म्हटले आहे की, या प्रकरणात अंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. म्हणून आम्हाला चौकशी करायची आहे. यात अनेक संशयित आरोपी आहेत ज्यांची अजून ओळख पटवायची आहे. त्यासाठी चौकशी गरजेची आहे, असेही वकिलांनी न्यायालयात सांगितले.

एनसीबीच्या वतीने वकिलांनी सांगितले की, आम्ही आरोपींच्या चौकशीदरम्यान जुहूमधील ९ व्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केले. एनसीबीचे वकील अनिल सिंग म्हणाले की, या आरोपींवर जामीन मिळू शकेल, अशी कलमे जरी लावलेली असली तरी मी मुंबई हायकोर्टात सुनावणी झालेली तीन उदाहरणे समोर ठेवतो ज्यामध्ये NDPS ऍक्टमधील प्रकरणात जामीन नाकारण्यात आला होता.

 

हे ही वाचा:

जपानच्या नव्या पंतप्रधानांनी पदभार स्वीकारताच घेतला ‘हा’ अजब निर्णय

कृषी कायद्यांना स्थिगिती दिल्यानंतर तुम्ही कशाचा विरोध करताय?

अफगाणिस्तानमधील आर्थिक, सामाजिक ढाचा कोसळण्याच्या मार्गावर

‘मराठवाडा आणि विदर्भ हे सरकारच्या अजेंड्यावरचं नाही’

 

अनिल सिंग यांनी तेव्हाची रिया चक्रावर्तीची ऑर्डर वाचून दाखविली. त्यात तिला जामीन नाकारण्यात आला होता. एनसीबीने ११ ऑक्टोबर पर्यंत कोठडीची मागणी केली होती. पण ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी दिली आहे. एनसीबीच्या वकिलांनी सांगितले की, आम्ही समाजाला ड्रग्समुक्त बनवण्याची मोहीम राबवतोय. त्यामुळे तुमच्याकडे कमी प्रमाणात ड्रग्स सापडलं याचा अर्थ तुम्हाला बेल मिळावी अस तुम्ही म्हणू शकत नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा