आर्यन खान आता एक रात्र राहणार एनसीबी कोठडीत

आर्यन खान आता एक रात्र राहणार एनसीबी कोठडीत

न्यायालयाने आर्यन खान आणि इतर सात आरोपींना क्रूझ शिप ड्रग छापा प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर एनसीबीची वाढीव कोठडीची मागणी, एनसीबीने सादर केलेला अहवाल अस्पष्ट असल्याकारणाने नाकारली आहे.

दरम्यान, वकील सतीश मनेशिंदे आर्यन खानसाठी अंतरिम जामीन अर्ज दाखल केला आहे. ज्याला अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी विरोध केला आहे. या याचिकेवर उद्या सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे.

गेल्या आठवड्यात मुंबई किनारपट्टीवरील क्रूझ जहाजावरील ड्रग संबंधित प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ११ ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि इतर सहा आरोपींची पुढील कोठडी मागितली होती.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ जहाजावरील ड्रग्ज जप्तीशी संबंधित प्रकरणात इतर सात आरोपींसह जामिनासाठी मुंबईतील एस्प्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आले. खान आणि इतर दोघे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) ताब्यात आहेत.

त्याआधी, क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला शाहरुख खान पुत्र आर्यन खान याच्यासह ३ जणांना एनसीबीने अटक केली. एनडीपीएस ऍक्टच्या ८सी, २० बी, २७ आणि ३५ या भारतीय दंड विधान कलमाखाली आर्यन आणि इतर दोघांना ही अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

छत्तीसगडमध्ये का सुरु झाला हिंदू-मुसलमान संघर्ष?

पाकिस्तानला मिळणारी मदत तातडीने थांबवा!

अखेर उघडले दार…

देशभर सुरु आदिशक्तीचा जागर

इतर ४ जणांची चौकशी सुरू असून त्यांना देखील अटक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रानी दिली होती. शेवटी त्यांनाही अटक करण्यात आली आहे. आर्यन याच्याकडे सापडलेल्या ड्रग्सबाबत त्याने एनसीबीकडे कबुली दिली असल्याचे समजते. त्याच्याकडे सापडलेले ड्रग्स हे सेवन करण्यासाठी आणले असल्याची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version