आर्यन खान आज रात्रीही तुरुंगातच

आर्यन खान आज रात्रीही तुरुंगातच

मुंबई उच्च न्यायालयाने कालच आर्यन खानची जामीनावर सुटका केल्याचा आदेश जारी केला असला तरी त्याची प्रमाणित प्रत तुरुंगात पोहोचलेली नाही. आर्थर रोड तुरुंगाची जामीन आदेश स्वीकारण्याची वेळ संपल्याने हा दस्तावेज नाकारण्यात आला आहे. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आर्यन खानला गुरुवारी जामीन मिळाला असला तरी या प्रक्रियेत लागणाऱ्या वेळेमुळे त्याला आजही तुरुंगातच रहावं लागणार आहे. आता आर्यन खानची उद्या सुटका होणार असल्याची माहिती आर्थर रोड कारागृह अधीक्षकांनी (जेलर) दिली आहे.

आर्यनला काल जामीन मिळाल्यानंतर आज अभिनेत्री जुही चावला संध्याकाळी चारच्या सुमारास सेशन न्यायालयात दाखल झाल्या. त्यांनी आर्यन खानच्या जामीनावर गॅरेंटर म्हणून सही केली. यावेळी त्यांच्याबरोबर सतीश मानेशिंदे देखील न्यायालयात दाखल झाले होते. न्यायालयात सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडली. परंतु जेलमधून सुटका होण्याबाबतचे देखील काही महत्त्वाचे नियम असतात. आर्यनच्या जामीनाची सर्व कागदपत्रे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ऑर्थर रोड जेलच्या पेटीपत्रात पोहचणं आवश्यक होतं. कारण ही पेटी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंतच उघडी असते. वकील सतीश मानेशिंदे कोर्टातील सर्व कायदेशीर प्रक्रिया पार करुन कागदपत्रे घेऊन कोर्टातून जेलच्या दिशेला निघाले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. त्यामुळे आर्यनला आज जामीन देता येणार नाही, अशी माहिती ऑर्थर रोड जेल प्रशासनाकडून देण्यात आली.

आर्यन खानला काल जामीन मिळाला असला तरी त्याला अनेक अटी पाळाव्या लागणार आहेत. आर्यन खान पोलिसांना माहिती दिल्याशिवाय मुंबई सोडू शकत नाही आणि त्याला दर शुक्रवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो समोर हजर राहावे लागेल. असे न्यायालयाने आज दिलेल्या आदेशात म्हटले आहे. त्याच्या जामिनासाठी १४ अटी घालण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

आर्यन खानला पाळाव्या लागणार ‘या’ १४ अटी

गुरुग्राममध्ये रस्त्यावरील नमाजावरून राडे

त्रिपुरामध्ये कोणतीही मशीद जाळली नाही

उत्तरप्रदेशात या सात पक्षांची भाजपाला साथ

शाहरुख खानचा २३ वर्षीय मुलगा आर्यन खान याला काल मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. आदेशानुसार, त्याला ₹१ लाखाचा वैयक्तिक बाँड सादर करावा लागेल आणि त्याचा पासपोर्ट जमा करावा लागेल.

परवानगीशिवाय देश न सोडणे, ‘ज्या गोष्टीचे आरोप आहेत त्या गोष्टींमध्ये  सहभागी न होणे, त्याचा मित्र अरबाज मर्चंट सारख्या इतर आरोपींशी संवाद न साधणे आणि मीडियाशी संवाद न साधणे या अटींचा समावेश आहे.

आर्यन खानला दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत एनसीबी कार्यालयात जावे लागणार आहे. न्यायालयीन सुनावणीस हजर राहावे लागणार आहे आणि आवश्यकतेनुसार तपासात सहभागी व्हावे लागणार आहे.

यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन झाल्यास, एनसीबी जामीन रद्द करण्याची विनंती करू शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे. आर्यन खानला २ ऑक्टोबर रोजी एका क्रूझ शिप पार्टीवर ड्रग्जच्या धाडीनंतर अटक करण्यात आली होती. तो तीन आठवड्यांपासून मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहे.

Exit mobile version