आर्यन खान कंटाळला! मुंबई उच्च न्यायालयात केली याचिका

आर्यन खान कंटाळला! मुंबई उच्च न्यायालयात केली याचिका

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने क्रूझ शिप ड्रग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी दिलेल्या जामीन अटींमध्ये बदल करावा ह्या संदर्भात ही याचिका आहे.

क्रूझ शिप ड्रग प्रकरणात खान आणि सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने तीन आरोपींना १४ अटींची पूर्तता करण्याचे आदेश देत जामिन मंजूर केला होता. अनेक अटी मध्ये उपस्थिती दर्शवण्यासाठी दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कार्यालयात हजर राहणे ही एक अट होती.

खान यांनी खालील कारणांवरून त्या आदेशात बदल करण्याची मागणी केली आहे. प्रकरणाचा तपास एनसीबीच्या दिल्ली कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आला असल्याने मुंबई कार्यालयातील त्यांच्या हजेरीच्या फेऱ्या शिथिल कराव्यात. दर शुक्रवारी जेव्हा ते मुंबईतील एनसीबी कार्यालयात जातात तेव्हा कार्यालयाबाहेर मीडिया कर्मचार्‍यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे मानसिक ताण येत आहे.

या सर्व बाबी लक्षात घेऊन खान यांनी दर शुक्रवारी एनसीबी मुंबई कार्यालयात हजर राहण्याचे कोर्टाने लावलेली अट शिथिल करण्याची मागणी केली आहे. ह्या अर्जावर १३डिसेंबर २०२१ रोजी न्यायमूर्ती सांबरे यांच्यासमोर दाखल होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

सुप्रिया ताईंची शिकवणी न घेतल्याने नवाब मलिक नापास

सीडीएस बिपिन रावत यांना लष्करी सन्मानात निरोप, १७ तोफांची दिली सलामी

‘आदित्य’ सूर्यावर जाणारच!

नवाब मलिक यांचा बिनशर्त माफीनामा

 

शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान याला क्रूझ पार्टीप्रकरणी एनसीबीने ताब्यात घेतले होते. त्याच्यासह या बोटीवरील आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आले होते. काही काळ आर्यन खान हा या प्रकरणात तुरुंगात राहिला. नंतर त्याला जामीन देण्यात आला. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्यात आला होता.

Exit mobile version