आर्यनच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात गोंधळ

आर्यनच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात गोंधळ

शाहरुख खानचा मुलगा आणि कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्सप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान हायकोर्टात गोंधळ उडाला. कोर्टात वकिलांची गर्दी वाढल्याने न्यायमूर्ती नितीन सांब्रे न्यायासनावरून उठले. कोर्टातील कर्मचा-यांनी सर्वांना बाहेर काढले. पंधरा मिनिटांच्या व्यत्ययानंतर मीडिया आणि प्रकरणाशी संबंधित असलेल्यांनाच केवळ प्रवेश देण्यात आला.

दरम्यान, आर्यन खानचा जामीन फेटाळला जावा असे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने न्यायालयात म्हटले आहे. आर्यन खानच्या जामीन याचिकेला विरोध करण्यासाठी एनसीबीने उच्च न्यायालया समोर उत्तर दाखल केले आहे.

एनसीबीने म्हटले आहे की, चौकशीत त्याचे आंतरराष्ट्रीय ड्रग कनेक्शन उघड झाले आहे. त्याची चौकशी केली जात आहे.  हे आंतरराष्ट्रीय संबंध योग्यरित्या शोधण्यासाठी वेळ लागेल. त्याला जामीन मिळाल्यास त्याने पुराव्यांशी छेडछाड करणे किंवा पळून जाणे किंवा साक्षीदारावर प्रभाव टाकणे हे नाकारता येत नाही. “एका प्रभाकर साइलच्या कथित प्रतिज्ञापत्राकडे लक्ष वेधून” आणि “चालू असलेल्या तपासादरम्यान साक्षीदारांवर छेडछाड, प्रभाव टाकण्याची स्पष्ट उदाहरणे आहेत” असे म्हणत आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला जावा, असे एनसीबीने आपल्या उत्तरात म्हटले आहे. एनसीबीने अधिक सखोल चौकशीची गरज असल्याचे सांगितल्यामुळे त्वरित आर्यन खानला जामीन मिळेल याची शक्यता कमी आहे.

आर्यन खानच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी हे न्यायालयात आर्यन खानची बाजू मांडणार आहेत.

 

हे ही वाचा:

आर्यन खान आणि अनन्या पांडेचे व्हॉट्सऍप चॅट आले समोर!

भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा

समीर वानखेडे बाजूला झाले तर फायदा कोणाचा?

‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे

 

आर्यनने मुंबई हायकोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात असेही म्हटले आहे की, तो प्रभाकर साईलला ओळखत नाही किंवा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. अलीकडे जे आरोप-प्रत्यारोप होत आहेत, त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. आर्यन खानने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, हा एनसीबीचे अधिकारी आणि राजकीय लोकांमधील वाद आहे. मी एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर कोणताही आरोप केलेला नाही.

Exit mobile version