आर्यन खानचा ३० ऑक्टोबरपर्यंत तुरुंगवास निश्चित

आर्यन खानचा ३० ऑक्टोबरपर्यंत तुरुंगवास निश्चित

नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्स्टन्स (एनडीपीएस) कायद्याअंतर्गत विशेष न्यायालयाने बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे.

मुंबईच्या विशेष न्यायालयाने बुधवारी (२१ ऑक्टोबर) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला होता. आर्यन खानची याचिका विशेष न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याची याचिका तातडीने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, काल न्यायालयाच्या कामाची वेळ संपल्यामुळे त्यावर आज सुनावणी होणे अपेक्षित होते.

आर्यन सध्या मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात आहे. दरम्यान आज सकाळीच अभिनेता शाहरुख खानने आपला मुलगा आर्यन खानची आर्थर रोड कारागृहात भेट घेतली. सुमारे १० ते १५ मिनटे शाहरुख खानने तुरुंगात आर्यनची भेट घेतली. कोरोना काळात खबरदारी म्हणून कारागृहातील कैद्यांना भेटण्यास बंदी होती. मात्र, आजपासून हे सर्व निर्बंध शिथिल करून नियमांचे पालन करून कैद्यांना भेटण्याची नातेवाईकांना परवानगी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी भेट

पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले

सोशल मीडियामध्ये येणार नवे ‘ट्रम्प’कार्ड

आंदोलकांना रस्ते अडवण्याचा अधिकार नाही

आर्यन खान सोबतच अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले होते. क्रूझवरील पार्टी प्रकरणात एनसीबीने आर्यन खानला अटक केली होती. क्रूझवरील ड्रग्स पार्टी उधळत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यातील तीन जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांचा समावेश होता.

Exit mobile version