दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना जामीन

शुक्रवारी जामिनावर सुटका होण्याची शक्यता

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना जामीन

दिल्ली मद्यघोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊज ऍव्हेन्यू न्यायालयाने गुरुवारी जामीन दिला. केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी जामीन मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

सद्यस्थितीत केजरीवाल हे दिल्लीतील तिहार तुरुंगात कैद आहेत. आज म्हणजेच शुक्रवारी जामीन बंधपत्रासाठी ड्युटी जजसमोर त्यांना सादर केले जाईल. जामीन बंधपत्र स्वीकारले गेल्यास शुक्रवारीच त्यांची सुटका होईल.

अरविंद केजरीवाल यांना कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी १० मे रोजी हंगामी जामीन मिळाला होता. त्याचा कालावधी १ जूनला संपुष्टात येताच २ जून रोजी केजरीवाल हे तिहार तुरुंगात परत गेले होते.

आम आदमी पक्षाचे खासदार सौरभ भारद्वाज यांनी केजरीवाल यांना जामीन देण्याचा निर्णय हा कनिष्ठ स्तरावरील न्यायालयांसाठी आशेचा किरण असल्याची प्रतिक्रिया दिली. ‘केजरीवाल यांना कनिष्ठ स्तरावरील न्यायालयातून जामीन मिळणे हा निर्णय संपूर्ण देशासाठी मैलाचा दगड ठरेल. आतापर्यंत असे दिसून आले आहे की, पीएमएलए प्रकरणी कोणताही दिलासा कनिष्ठ न्यायालये, उच्च न्यायालयात नव्हे तर सर्वोच्च न्यायालयात मिळतो. खरे तर, न्यायव्यवस्थेत न्यायसुसंगत निर्णय कोणतेही न्यायालय देऊ शकते. मात्र कनिष्ठ स्तरावरील न्यायालयात दिलासा देण्यासाठी हात आखडता घेतला जात होता. मात्र हा निर्णय कनिष्ठ स्तरावरील न्यायालयासाठी आशेचा किरण ठरेल,’ असा आशावाद भारद्वाज यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा..

उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मराठा आरक्षणाचे मारेकरी!

बँक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अमटेक कंपनीसंबंधित ३५ ठिकाणांवर छापेमारी

बिहार सरकारला न्यायालयाचा झटका !

‘अकबरनगर घेतय मोकळा श्वास, बेकायदेशीर मशिदी जमीनदोस्त’!

आम आदमी पक्षानेही त्यांच्या संयोजकांच्या जामिनावर ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली आहे. ‘सत्य अस्वस्थ होऊ शकतो, पराभूत नाही. भाजप आणि ईडीचे अनेक आक्षेप फेटाळून माननीय न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘आप’ने दिली आहे.

२१ मार्च रोजी दिल्ली सरकारने नव्या अबकारी धोरणातील कथित अनियमितता प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. या प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अद्याप तुरुंगात आहेत.

Exit mobile version