अरुण गवळी उर्फ डॅडीची तुरुंगातून सुटका होणार; मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश

नागपूर खंडपीठाने दिले निर्देश

अरुण गवळी उर्फ डॅडीची तुरुंगातून सुटका होणार; मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश

अंडरवर्ल्ड डॉन उर्फ डॅडी अरुण गवळी याला न्यायालयाने दिलासा दिला आहे. अरुण गवळी याची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. २००६ च्या शासन निर्णयाच्या आधारे अरुण गवळी याच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर खंडपीठाने मुदतपूर्व सुटकेचे निर्देश दिले आहेत.

नागपूर खंडपीठात याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र निकाल राखून ठेवला होता. दरम्यान अरुण गवळी यांची सुटका करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. २००६ सालच्या शासन निर्णयाच्या आधारे डॅान अरुण गवळीनं शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. अखेर नागपूर खंडपीठाने अरूण गवळी याच्या सुटकेचे निर्देश देत यासंदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही देण्यात आला आहे. नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात अरूण गवळी उर्फ डॅडी याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तसेच इतर गुन्हेगारी कृत्यासाठीही त्याला जन्मठेप ठोठावण्यात आली. सध्या अरुण गवळी नागपूच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध!

केजरीवाल यांचा फोटो पाहून भगतसिंग यांच्या नातूचा संताप!

“भारतातील निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात हे संयुक्त राष्ट्रांनी शिकवू नये”

उरीमध्ये दहशतवाद्यांचा कट फसला, एक दहशतवादी ठार!

काय आहे २००६ सालचा शासन निर्णय?

१० जानेवारी २००६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या, शारीरिकदृष्ट्या अशक्त झालेल्या आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देऊन कारागृहातून मुक्त करण्याची तरतूद आहे. याचं आधारे अरुण गवळीला दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात गृह विभाग आणि इतर प्रतिवाद्यांना हरकती घेण्यासाठी न्यायलयाने चार आठवड्यांचा अवधी दिला आहे.

Exit mobile version