शिवमोग्गामध्ये सावरकर वि. टिपू सुलतान

कर्नाटकमधील शिवमोग्गा येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी शहरात १४४ कमल लागू केले आहे.

शिवमोग्गामध्ये सावरकर वि. टिपू सुलतान

कर्नाटकमधील शिवमोग्गा येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी शहरात १४४ कमल लागू केले आहे. टिपू सुलतान विरुद्ध विनायक दामोदर सावरकर यांच्या नावावरून हा वाद दोन गटांमध्ये सुरू झाला होता. पोस्टर लावण्यावरून हा वाद सुरू झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.

शिवमोग्गा शहरात असलेल्या अमीर अहमद सर्कल येथे हिंदुत्ववादी संघटनांनी विनायक दामोदर सावरकर यांचा फोटो लावला होता. काही वेळाने टिपू सुलतान सैन्याचा झेंडा घेऊन काही मुस्लिम तरुण त्याच ठिकाणी पोहोचले. या तरुणांनी सावरकरांचा फोटो असलेलं पोस्टर काढण्याचा प्रयत्न केला. यावरून दोन्ही गटात वाद झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परीस्थिती नियंत्रणात आणली. तर तणाव निर्माण होऊ नये म्हणून शहरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. सावरकरांचे सर्व पोस्टर हटवण्यात आले असून मंगळुरूच्या सुरतकल क्रॉसरोडला विनायक दामोदर सावरकरांचे नाव देणारे पोस्टरही पोलिसांनी हटवले आहे.

या दरम्यान एका व्यक्तीवर चाकू हल्ला देखील करण्यात आला. या हल्ल्यात जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

हे ही वाचा:

७५ विधवा महिलांनी फडकावले ७५ राष्ट्रध्वज

भ्रष्टाचार, घराणेशाहीवर राहुल गांधींची बोलती बंद

पुलवामात दोन दहशतवाद्यांना टिपणाऱ्या देवेंद्र प्रताप सिंह यांना कीर्ती चक्र

‘भ्रष्टाचार आणि घराणेशाही नष्ट करू’

वीर सावरकर यांच्या पोस्टरसाठी परवानगी मिळावी आणि दुसऱ्या गटावर कारवाई करण्यात यावी अशी हिंदूत्ववादी संघटनांची मागणी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याप्रकरणी ही कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version