अमरावतीत हिंसाचार; कलम १४४ लागू  

अमरावतीत हिंसाचार; कलम १४४ लागू  

अमरावतीमधील अचलपूर येथे झेंडा काढल्यावरून दोन गटात झालेल्या वादानंतर आता अचलपूर आणि परतवाडा येथे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. झेंड्यावरून झालेल्या वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले आणि त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

अचलपूर शहरातील प्रवेशद्वार असलेल्या खिडकी गेट आणि दुल्हा गेट येथील ऐतिहासिक मोठ्या दरवाजांवर दरवर्षी सण-समारंभ प्रमाणे विविध धर्माचे झेंडे लावले जातात. मात्र, त्यानंतर समाजकंटकांनी येथील झेंडा काढल्याने वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाली आणि दोन गटात राडा झाला.

पोलिसांच्या मध्यस्थीमुळे हा वाद निवळला. त्यानंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. आणखी कुठला वाद उफाळू नये यासाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या हिंसाचार प्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली असून ३५ जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा; भोंग्यासाठी परवानगी घ्या अन्यथा….

… म्हणून WHO चे महासंचालक येणार भारत दौऱ्यावर

‘जेम्स लेन यांच्या पुस्तकातील प्रत्येक वाक्य शिवरायांविरोधात’

राऊत यांनी १०० कोटींचा आकडा आणला कुठून?

“अचलपुरमध्ये दोन गटात झालेला वाद विकोपाला जाण्याच्या पूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. शहरात रात्रीपासून जमाबंदी सुरू करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे,” अशी माहिती अचलपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार गरुड यांनी दिली आहे.

Exit mobile version