घाटकोपर दुर्घटना प्रकरणी अर्षद खानला लखनौमधून अटक

होर्डिंग कंपनीच्या मालकासह चार जणांना पूर्वी अटक

घाटकोपर दुर्घटना प्रकरणी अर्षद खानला लखनौमधून अटक

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात फरार असणाऱ्या अर्षद खान याला अखेर उत्तर प्रदेशातील लखनौ येथून अटक करण्यात आली आहे. १७ जणांचा बळी घेणाऱ्या या होर्डिंग कंपनीच्या मालकासह चार जणांना पूर्वी अटक झाली होती, अर्षद खान ही पाचवी अटक आहे.

रेल्वेचे माजी पोलीस आयुक्त यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा अर्षद खान याने दुर्घटनाग्रस्त होर्डिंग कंपनी इगो मीडिया कडून ४६ लाख रुपये घेतले असे तपासात समोर आले होते.

घाटकोपर पूर्व येथील पूर्व द्रुतगती महामार्गाला लागून असलेल्या लोहमार्ग पोलिसांच्या जागेवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत महाकाय होर्डिंग १३ मे २०२३ रोजी पेट्रोल पंपावर कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ८० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते.

याप्रकरणी प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात होर्डिंग कंपनी इगो मीडियाचे मालक भावेश भिंडे सह कंपनीचे संचालक, अभियंते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान हा गुन्हा मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करून विशेष तपास पथक गठीत करण्यात आले होते.

विशेष तपास पथकाने या प्रकणात भावेश भिंडे, जान्हवी मराठे सह चार जणांना अटक करण्यात आली होती. दुर्घटनाग्रस्त होर्डिंग हे बेकायदेशीर होते व हे होर्डींग उभारण्याच्या कामात मोठा आर्थिक व्यवहार झाला होता, त्यात माजी रेल्वे पोलीस आयुक्त यांचे नाव समोर येत होते.

हे ही वाचा: 

दिल्लीत दादागिरी जमेल काय ?

…आणि काँग्रेसचा पुन्हा सुपडा साफ झाला!

धक्कादायक! मालेगावात १,००० रोहिंग्या, बांगलादेशींना दिले जन्म दाखले!

देशभरात शोककळा अन राहुल गांधींचा नववर्ष साजरा करण्यासाठी परदेश दौरा!

आयपीएस अधिकारी यांचा निकटवर्ती असलेला अर्षद खान याने ४६ लाख इगो मिडियाकडून घेतले होते, हे पैसे पुढे कुठे गेले त्याचे काय झाले हे कळू शकले नाही. अर्षद खानने पैसे घेतल्याचे तपासात समोर येताच अर्षद खान याला या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले होते.

त्यानंतर अर्षद खान हा फरार झाला होता, त्याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज देखील न्यायालयाने फेटाळला होता. पोलिस अर्षद खान हा शोध घेत होते, मात्र तो पोलिसांच्या तावडीत येत नव्हता. अखेर सोमवारी अर्षद खान याला गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश येथील लखनौ येथून अटक करण्यात आली आहे.सोमवारी अर्षद ला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ६ जानेवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version