मुख्याध्यापकावर १४२ विद्यार्थीनींनी केला लैंगिक छळाचा आरोप!

हरयाणातील घटना, मुख्याध्यापकाला अटक

मुख्याध्यापकावर १४२ विद्यार्थीनींनी केला लैंगिक छळाचा आरोप!

हरियाणातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे.हरियाणातील एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापकांवर तब्बल १४२ विद्यार्थिनींनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे.पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक केली असून पुढील चौकशी पोलीस करत आहेत.

हरियाणातील जिंद जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत ही घटना घडली.या सरकारी शाळेतील मुख्याध्यापकावर १४२ विद्यार्थिनींनी लैगिक छळाचा आरोप केला आहे.सुरुवातीला ६० विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकावर लैंगिक छळाचे आरोप केला होता.मात्र, आता ही संख्या १४२ वर पोहचली आहे.लैंगिक छळ समितीच्या
तपासानुसार हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत चार जवान शहीद!

येमेनमध्ये भारतीय मुलीला मृत्युदंडाची शिक्षा

पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान काकर यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून समन्स

मराठा राहिला बाजूलाच, मुस्लिम आरक्षणासाठी दोन्ही काँग्रेसची बँटींग…

या संदर्भांत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी सांगितले की, पीडित विद्यार्थिनीनि आरोप केला की, शाळेतील मुख्याध्यापक (५५) हा आपल्या कार्यालयात बोलावत असे व अश्लील कृत्ये करत असे.याबाबत राज्य महिला आयोगाकडून पोलिसांना कळवण्यात आले व मुख्याध्यापकाला त्वरित अटक करावी अशी मागणी केली.तसा पोलिसांना अल्टिमेटही महिला आयोगाकडून देण्यात आला होता.त्यानंतर हरियाणा पोलिसांनी ६ नोव्हेंबरला मुख्याध्यापकाला अटक केली.जिंदच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे.या प्रकरणाची विविध विभागांकडून चौकशी सुरू आहे.

शाळेतील काही विद्यार्थिनींनी लैंगिक छळाबाबत हरियाणा राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली.त्यांनतर महिला आयोगाने ही तक्रार १४ सप्टेंबर रोजी पोलिसांकडे पाठवली. परंतु, पोलिसांनी ३० ऑक्टोबर पासून कारवाईला सुरुवात केली.या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले.शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकाला २७ ऑक्टोबर रोजी निलंबित करण्यात आले आहे.पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 

 

 

Exit mobile version