केजारीवालांच्या नावे मेट्रोमध्ये धमकीचा संदेश लिहिणाऱ्याला अटक; आरोपीचा कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंध नाही

‘आप’कडून भाजपाला केले जात होते लक्ष्य

केजारीवालांच्या नावे मेट्रोमध्ये धमकीचा संदेश लिहिणाऱ्याला अटक; आरोपीचा कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंध नाही

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू एकीकडे सुरू असताना दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धमकी देणारा संदेश दिल्लीतील मेट्रो स्थानकावर लिहिण्यात आला होता. हे संदेश पंतप्रधान कार्यालय आणि भाजपाच्या इशाऱ्यानंतर लिहिण्यात आल्याचा आरोप ‘आप’कडून करण्यात येत होता. अशातच आता दिल्ली मेट्रो स्थानकावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात संदेश लिहिणाऱ्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी बुधवार, २२ मे रोजी अटक केली आहे. दिल्ली मेट्रोच्या राजौरी गार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास राजौरी गार्डन पोलीस करत होते.

दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने दिल्ली मेट्रोमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावे धमकीचा संदेश लिहिला होता. अंकित गोयल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. धमकी लिहिणाऱ्या आरोपीचा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आला आहे. माहितीनुसार, आरोपी उत्तर प्रदेशच्या बरेलीचा रहिवासी आहे. तसेच हा आरोपी सुशिक्षित असून तो एका प्रसिद्ध बँकेत काम करतो. घराची नोंदणी करण्यासाठी तो बरेलीहून ग्रेटर नोएडा येथे आला होता. अंकितने येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम केला होता आणि दिल्ली मेट्रोने प्रवास करत असताना त्याने केजरीवाल यांना धमकीचे संदेश लिहिले होते. आतापर्यंतच्या तपासानुसार तो कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.

हे ही वाचा:

पुणे गाडी अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध?

भाजप ३०० जागा पार करेल, पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी नाही!

संथगती मागचे सत्य, बिघाडा मागचा बोभाटा…

पुणे हिट अँड रन प्रकरणी बाल न्याय मंडळाने दिलेला निर्णय धक्कादायक

१९ मे रोजी पटेल नगर आणि राजीव चौक मेट्रो स्टेशनवर सीएम अरविंद केजरीवाल यांचा इंग्रजीत लिहिलेला धमकीचा मेसेज सापडला होता. याप्रकरणी ‘आप’कडून भाजपाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, आता यात भाजपाचा हात नसल्याचे समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १० मे रोजी तिहार तुरुंगातून बाहेर आले. तेव्हापासून ते आम आदमी पार्टी आणि इंडिया अलायन्सच्या उमेदवारांच्या बाजूने जोरदार प्रचार करत आहेत.

Exit mobile version