मानखुर्दमध्ये चालत होता बनावट नाेटांचा छापखाना

सात लाखांच्या बनावट नाेटा जप्त

मानखुर्दमध्ये चालत होता बनावट नाेटांचा छापखाना

बनावट नाेटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न मानखूर्द पाेलिसांनी हाणून पाडला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी राेहित शहा याला अटक केली आहे. आपल्या घरातच छापखाना टाकून २००, १०० व ५० रुपयांच्या बनावट नोटा छापताना राेहितला पाेलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.. पोलिसांनी त्याच्या घरातून सात लाख १६ हजारांच्या बनावट नोटा आणि त्या छापण्यासाठी लागणारे साहित्य असा ९ लाख १६ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मानखुर्दच्या सोनापूर परिसरात असलेल्या डुक्कर चाळीतील एका दुमजली घराच्या पहिल्या मजल्यावर बनावट नोटा छापल्या जात असल्याची माहिती मानखुर्द पोलिसांना मिळाली हाेती. रोहित शहा नावाचा इसम हे गैरकृत्य करीत असल्याचे कळताच वरिष्ठ निरीक्षक महादेव कोळी, निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने डुक्कर चाळीतील त्या घरावर छापा टाकला. त्यावेळी रोहित शहा हा प्रिंटरवर बनावट नोटा छापत असताना रंगेहाथ सापडला. त्या ठिकाणी २००, १००, ५० रुपये दराच्या बनावट नोटा छापण्यात आल्याचे पाेलिसांना दिसून आले.

हे ही वाचा:

दसरा मेळाव्यासाठी शिंदेंचा अर्ज स्वीकारला, ठाकरेंचा अर्ज फेटाळला

अमित शहांच्या ताफ्यासमोर टीआरएस नेत्याने गाडी केली पार्क

७० वर्षानंतर चित्ते आले भारतात, पंतप्रधान मोदींनी काढले फोटो

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

राेहितला अटक करून पाेलिसांनी बनावट नाेटा व त्या छापण्यासाठीचे लॅपटॉप, कलर प्रिंटर, कलर बॉटल, कागद इत्यादी साहित्य जप्त केलं आहे. बनावट नोटा छापतोय हे कोणाला कळू नये म्हणून दहिसर येथे राहणाऱ्या रोहितने मानखुर्द येथील एका दुमजली घराच्या पहिल्या मजल्यावरील घरात छापखाना टाकला होता. पण पाेलिसांनी हा छापखाना छापा टाकून उध्वस्त केला आहे. या बनावट नाेटा चलनात आणण्यासाठी त्याचे साथीदार काेण, या आधी किती बनावट नाेटा चलनात आल्या इत्यादी गाेष्टींचा पाेलिस कसून तपास घेत आहे. पाेलिसांनी राेहित शहा याला पाेलिस काेठडी सुनावली आहे.

Exit mobile version