डान्सर सपना चौधरीला होणार अटक?

प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिच्या अडचणीत वाढ झाली असून लखनौच्या एका न्यायालयाने तिच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

डान्सर सपना चौधरीला होणार अटक?

प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिच्या अडचणीत वाढ झाली असून लखनौच्या एका न्यायालयाने तिच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. सोमवारी एक नृत्याचा कार्यक्रम रद्द केल्याबद्दल आणि तिकीटधारकांना पैसे परत न केल्याबद्दल हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शंतनू त्यागी यांनी पुढील सुनावणीची तारीख ३० सप्टेंबर निश्चित केली आहे. सोमवारी सुनावणीसाठी सपना चौधरी न्यायालयात हजर झाली नाही आणि तिच्या वतीने कोणताही अर्ज करण्यात आला नाही. त्यावर कडक भूमिका घेत न्यायालयाने सपना चौधरीविरुद्ध अटक वॉरंट बजावण्याचे आदेश दिले आहेत. सपना चौधरीला अटक करून हजर करण्यात यावे, असे एसीजेएम न्यायालयाने आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे.

१३ ऑक्टोबर २०१८ रोजी स्मृती उपवन येथे दुपारी ३.०० ते १०.०० या वेळेत एक नृत्याचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची तिकीट ३०० रुपये दराने करण्यात आली होती. सपना चौधरीचा डान्स पाहण्यासाठी हजारो लोकांनी तिकिटे विकत घेतली होती. मात्र, या कार्यक्रमात सपना चौधरी आलीच नाही. कार्यक्रमस्थळी उपस्थित हजारो लोकांनी गोंधळ घातला होता.

हे ही वाचा:

सातव्या थरावरून पडून मुंबईच्या गोविंदाचा मृत्यू

राकेश झुनझुनवाला ट्रस्टची जबाबदारी ‘या’ व्यक्तीच्या खांद्यावर

आता शिवसेनेला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा

एम्स आता ओळखले जाणार ‘या’ नावाने

यापूर्वी २०२१ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सपना चौधरीविरुद्ध फसवणूक आणि विश्वासभंगाच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला होता. सपनाचे व्यवस्थापन करणार्‍या एका सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीने ती आणि तिच्या आई आणि भावासह इतर अनेकांविरुद्ध विश्वासभंग, गुन्हेगारी कट, फसवणूक आणि निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

Exit mobile version