महाराष्ट्रात ‘नाचलेल्या’ सपना चौधरीविरुद्ध अटक वॉरंट

महाराष्ट्रात ‘नाचलेल्या’ सपना चौधरीविरुद्ध अटक वॉरंट

हरयाणामधील प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी विरुद्ध लखनऊ कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. सपनावर डान्सचा कार्यक्रम रद्द करण्याचा आणि तिकिटांचे पैसे परत न केल्याचा आरोप आहे. अ‍ॅडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट शांतनू त्यागी यांनी हे वॉरंट जारी केले असून त्याची सुनावणी २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

कार्यक्रम रद्द करण्याचे हे प्रकरण तीन वर्षे जुने असून सपना विरोधात १४ ऑक्टोबर २०१८ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सपनासोबतच या कार्यक्रमाचे आयोजक जुनैद अहमद, अमित पांडे, किवद अली, नवीन शर्मा, रत्नाकर उपाध्याय यांचाही उल्लेख करण्यात आला होता. आता याप्रकरणी लखनऊ कोर्टाने सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे.

हे ही वाचा:

शेळी पालनाच्या बहाण्याने सुरू होता ड्रग्ज कारखाना

गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका; फडणवीसांचे पत्र

कोकणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कलगीतुरा!

पवई येथील ह्युन्डाई कार सर्व्हिस सेंटर आगीच्या तडाख्यात

२०१८ मधील १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते रात्री १० या वेळात स्मृती उपवनमध्ये सपना चौधरीचा एक कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांकडून ३०० रुपये तिकीट शुल्क आकारण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाच्या तिकिटांची विक्री ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करण्यात आली होती. तिकिटांची खरेदी करून सपना चौधरीच्या कार्यक्रमासाठी हजारो प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली होती. मात्र, रात्रीचे १० वाजले तरीही सपना चौधरी कार्याक्रमासाठी आलीच नाही. त्यानंतर कार्यक्रम रद्द करूनही प्रेक्षकांना तिकीटाचे पैसेही परत केले गेले नाहीत. याप्रकरणात कोर्टाने ४ सप्टेंबर २०२१ रोजी सपना चौधरीचा अर्ज फेटाळला होता.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळीनिमित्त परळी, बीड येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सपना चौधरीचा डान्स ठेवला होता. एकीकडे महाराष्ट्रातील जनतेचे अनेक प्रश्न उपस्थित असूनही डान्सरचा कार्यक्रम ठेवल्याप्रकरणी मुंडे यांच्यावर टीका करण्यात आली होती आणि सपना चौधरीचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले होते.

Exit mobile version