१० लाखांची फसवणूक ? इन्स्टा डे कंपनीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश

फारुख मलिक यांनी केली होती याचिक

१० लाखांची फसवणूक ? इन्स्टा डे कंपनीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश

दूध आणि ज्यूस वितरण करणाऱ्या आनंद कुमार राज यांच्या इन्स्टाडे फूड अँड बिवरेज कंपनीने फारुख मलिक यांच्या आयरस सेंटर कंपनीची १० लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली श्रीनगर येथील शहर न्यायदंडाधिकाऱ्यांनी अजामीनपात्र वॉरंट बजावत राज यांना अटक करण्याचे आणि दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्याचे आदेश दिलेले आहेत, पण अद्याप त्यासंदर्भात कारवाई झालेली नाही.

श्रीनगर स्थित आयरस या कंपनीचे मालक फारुख मलिक यांची ही फसवणूक झालेली असून तशी याचिका त्यांनी श्रीनगरच्या न्यायालयात दाखल केली होती.

फारुख मलिक हे २०२१ पासून इन्स्टाडे या कंपनीशी व्यवहार करत असून त्यांच्याकडून ज्यूस आणि दूध मागवत असत. त्यासाठी वर्षी आनंद कुमार राज यांना ९ लाख ५५ हजार रुपये आरटीजीएस मार्फत दिले. पण मागविलेली उत्पादने मात्र फारुख मलिक यांना मिळाली नाहीत. त्यानंतर २०२२मध्ये फारुख हे आनंद कुमार राज यांच्या मुंबईतील कार्यालयात गेले आणि त्यांनी ही रक्कम परत करण्यास सांगितले. आनंद राज यांनी ९ लाख ५० हजारांचा पुढील तारखेचा धनादेश त्यांना दिला. मात्र तो धनादेश वठला नाही.

त्यानंतर फारुख यांनी श्रीनगरमध्ये शहर दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने अनेक समन्स पाठवून आनंद राज यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. पण फारुख यांच्या म्हणण्याप्रमाणे आनंद राज यांनी आपले कार्यालय बंद केलेले आहे आणि ते अज्ञात स्थळी गेलेले आहेत. त्यांचा संपर्क होत नाही.

दोन वर्षे सातत्याने दंडाधिकारी न्यायालयात यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला. शेवटी न्यायालयाने आनंद कुमार राज यांना गुन्हेगार जाहीर करून अटक करण्याचे आदेश मुंबईतील पोलिस आयुक्तांना दिले. २६ डिसेंबर २०२३ला हे आदेश देण्यात आल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झाली नाही.

हे ही वाचा:

बांगलादेशींबाबत बोलणाऱ्या ममतांना परराष्ट्र मंत्रालयाचा सल्ला, म्हणाले, ‘दखल देऊ नका’ !

बोरिवलीतील कनाकिया समर्पण टॉवरला आग, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी !

वरळी स्पामध्ये झाली होती खबऱ्याची हत्या; स्पा मालकाला अटक, तीन जण ताब्यात

पुण्यातील पूरस्थितीत बचावकार्यासाठी लष्कराचे जवान मैदानात

परिणामी, न्यायालयाने ५ फेब्रुवारी २०२४ला पुन्हा एकदा तसे आदेश दिले पण तरीही ते पाळले गेले नाहीत, असे म्हणत न्यायालयाने ६ मार्च २०२४ला मुंबईच्या पोलिस आयुक्तांना न्यायालयात व्यक्तिगत हजर राहण्यास सांगितले. तसेच न्यायालयाचे आदेश न पाळल्याबद्दल आपल्यावर कारवाई का केली जाऊ नये, असा सवालही केला आहे. पोलिस आयुक्त कार्यालयाला या आदेशाची प्रत पाठविण्यात आल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

यासंदर्भात आनंद कुमार राज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे याचिकेत नमूद करण्यात आलेले दोन नंबर हे बंद आहेत

Exit mobile version