25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरक्राईमनामादोषींवर कारवाई करा किंवा मला फाशी द्या

दोषींवर कारवाई करा किंवा मला फाशी द्या

Google News Follow

Related

“दीपालीला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या डीएफओ विनोद शिवकुमार आणि अपर मुख्य प्रधान संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी. अन्यथा मलातरी फाशी द्यावी.” अशी उद्विग्न प्रतिक्रिया दीपाली चव्हाण हिच्या आईने व्यक्त केली आहे.

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी दीपालीच्या आईने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. विनोद शिवकुमार याने दीपालीला गर्भवती असताना जंगलात फिरायला लावले. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. त्यानंतरही दीपालीला रजा न देता दुसऱ्या दिवशी कामावर हजर राहायला सांगण्यात आले. गर्भपात झाल्यावर महिलांना रजा द्यावी, असा शासकीय नियम आहे. मात्र, दीपालीला त्रास देण्याच्या उद्देशाने विनोद शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी यांनी तिला कामावर हजर राहायला लावले. त्यामुळे या दोघांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा मलाही फाशी द्या, असे दीपालीच्या आईने म्हटले. त्यामुळे आता यशोमती ठाकूर आणि राज्य सरकार दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हे ही वाचा:

न्यायमुर्ती एन व्ही रामण्णा यांच्या नावावर राष्ट्रपतींच्या मान्यतेची मोहोर

लोकांनी कसं वागावं हे सांगता ते स्वतः कधी वागणार- राज ठाकरेंचा सवाल

गृहमंत्री पद दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे

नरेंद्र मोदींचे नागरिकांना पंचभाषिक आवाहन

मेळघाटातील दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. यात आता बेलदार समाजाने सुद्धा आक्रमक भूमिका घेत दीपालीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आरोपी डीएफओ विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली आहे. त्याप्रमाणे निलंबित मेळघाट व्याघ्र प्रकल्पचे वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावरही गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात यावी. याप्रकरणाची सीआयडी आणि एनआयए मार्फत चौकशी व्हावी. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी बेलदार समाज संघटनेचे अध्यक्ष राजू साळूंके यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा