अरमान कोहली १४ दिवस न्यायालयीन कोठडीत

अरमान कोहली १४ दिवस न्यायालयीन कोठडीत

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी तळोजा येथील तुरुंगात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने २८ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान, एनसीबीने त्याच्या राहत्या घ्ररी छापा टाकून कोकेन हा अमली पदार्थ मिळून आला होता. या प्रकणात एनसीबीने यापूर्वीच अजय सिंग या ड्रग्स पेडलर्सला अटक केली होती. त्याच्या माहितीवरून अरमान कोहलीच्या घरी छापा टाकून त्याला एनसीबीने अटक केली होती. एनसीबीने कोहली याच्या विरुद्ध एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली होती.

दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा न्यायालयत हजर करण्यात आले असता न्यायालायाने दोन दिवसांची कोठडी सुनावली होती. बुधवारी त्याची एनसीबी कोठडी संपली असता आज पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अरमान कोहलीची रवानगी तळोजा तुरुंगात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे ही वाचा:

भाजपाचा गुरुवारी मुंबई महानगरपालिकेवर ‘विश्वासघात’ मोर्चा

काय आहे सोन्याचा नवा निच्चांक?

बापरे! घाटकोपर- मानखुर्द उड्डाणपुलावर पहिल्याच दिवशी मृत्यू

परिवहन मंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

दरम्यान न्यायालयातून बाहेर पडताना अरमान कोहली याने माझ्यावर चुकीचे आरोप लावण्यात आले असून योग्य वेळ आल्यावर मी पत्रकार परिषद घेऊन सर्वासमोर माझी बाजू मांडेल असे त्याने म्हटले आहे.

Exit mobile version