25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामाअर्जुन पुरस्कार विजेत्या पोलीस उपाधीक्षकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

अर्जुन पुरस्कार विजेत्या पोलीस उपाधीक्षकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

पोस्टमार्टमनंतर हत्येचा संशय; पंजाबमधील संगरूरमध्ये होते तैनात

Google News Follow

Related

पंजाबमधील संगरूरमध्ये तैनात असलेल्या पोलीस उपाधीक्षकाचा (डीएसपी) मृतदेह जालंधर मध्ये आढळून आला आहे. यानंतर खळबळ उडाली आहे. डीएसपी दलबीर सिंग देओल यांचा मृतदेह सोमवार, १ जानेवारी रोजी बस्ती बावा खेल कालव्याजवळ रस्त्यावर पडलेला आढळून आला. दलबीर सिंग हे एक प्रसिद्ध वेटलिफ्टर होते आणि त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी जालंधरमधील एका गावात डीएसपी दलबीर यांचे काही लोकांशी भांडण झाले होते. यावेळी त्यांनी परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांनी गावकऱ्यांशी समेट घडवून आणला. एडीसीपी बलविंदर सिंग रंधावा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणीतरी फोन करून बस्ती बावा खेलजवळ कोणाचातरी मृतदेह पडल्याची माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले असता मृतदेह डीएसपी दलबीर यांचा असल्याचे उघड झाले. संगरूर येथे ते तैनात होते. त्यांच्या डोक्यालाही जखम झाली होती. प्राथमिक तपासात त्यांचा अपघात झाला असावा असा अंदाज पंजाब पोलिसांनी केला होता. मात्र, पोस्टमॉर्टममध्ये डीएसपीमच्या गळ्यामध्ये गोळी अडकल्याचे आढळून आले. घटनेनंतर डीएसपी दलबीर यांचे सर्विस पिस्तुल गहाळ असल्याचे निदर्शनास आले आहे.

डीएसपींच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरच्या रात्री न्यू इयर पार्टीनंतर त्यांनी दलबीर यांना बस स्टँडच्या मागे सोडले होते. त्यावेळी त्यांचे रक्षक उपस्थित नव्हते. सध्या पंजाब पोलीस बसस्थानकाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. याप्रकरणी दलबीर यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जात आहे.

हे ही वाचा:

कृष्णविवरांचा तपास करणारा भारत अमेरिकेनंतर दुसरा देश

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपान भूकंपाच्या धक्क्याने हादरलं!

बाबरीचे पक्षकार अंसारी म्हणतात, पंतप्रधान मोदींनी अयोध्येचे रुपडे पालटले!

इस्रोकडून भारतीयांना नव्या वर्षाची भेट; XPoSAT चे यशस्वी प्रक्षेपण!

दलबीर यांचे भाऊ रणजीत सिंह यांनी सांगितले की, दलबीरचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. हत्येचे प्रकरण असल्याचे वाटत असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. दलबीर सिंग हे एक प्रसिद्ध वेटलिफ्टर होते आणि त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा