नोएडामध्ये पुन्हा एकदा लिफ्टमधून कुत्र्याला नेण्यावरून वाद झाल्याची घटना घडली आहे. यावेळी निवृत्त आयएएस अधिकारी आणि दाम्पत्यादरम्यान मारहाण झाली. मारहाणीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात महिला आणि निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांमध्ये झटापट होत असल्याचे दिसून येत आहे. तर, महिलेचा पती या अधिकाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे. सेक्टर १०८ मधील पार्क लॉरिएट सोसायटीमध्ये ही घटना घडल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये समेट झाली आहे. मात्र, तरीही पोलिसांनी या प्रकरणी पोलिस चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत.
सेक्टर १०८ मधील पार्क लॉरिएट सोसायटीमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिवार व्हायरल झाला आहे. ही महिला आपल्यासोबत तिच्या कुत्र्याला लिफ्टमधून घेऊन जात होती. मात्र एक व्यक्ती तिला कुत्र्याला लिफ्टमधून घेऊन जाण्यास विरोध करत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. दोघांमध्ये वादविवाद सुरू झाल्यानंतर या महिलेने या निवृत्त आयएएस अधिकाऱ्याचा मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर वाद वाढला. निवृत्त आयएएस अधिकारी या महिलेच्या कानशिलात लगावतात. त्यानंतर दोघांमध्ये काही वेळ झटापट होते. त्यानंतर महिलेचा पती लिफ्टमध्ये येऊन निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला मारहाण करतो, असे या व्हिडीओत दिसत आहे.
हे ही वाचा..
पाकिस्तानला गोपनीय माहिती देणाऱ्याला राजस्थानमधून अटक
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन खासदारांनंतर आमदाराचा राजीनामा
मराठी नवउद्योजकांनी व्यावसायिक यशासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करुन घ्यावा
उत्तर गाझाच्या सीमेवर इस्रायली रणगाडे
या घटनेची माहिती मिळताच कोतवाली सेक्टर २९ मधील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओसह सोसायटीच्या सीसीटीव्हींचीही पाहणी केली. यात दोन्ही पक्षांमध्ये झटापट आणि मारहाण होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र त्यानंतर दोन्ही पक्षांनी लिखित स्वरूपात दोघांमध्ये समेट झाल्याचे स्पष्ट केले.