मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत कोणत्याही पुढाऱ्याला गावात प्रवेश दिला जाणार असे आवाहन आंदोलक जरांगे यांनी केल्यानंतर ठीक-ठिकाणी गावबंदीचे पोस्टर लावण्यात आले.मात्र, हे गावबंदीचे पोस्टर फाडल्याने दोन गट आपापसात भिडत तुंबळ हाणामारी झाली आहे.जालना जिल्ह्यात ही घटना घडली. या घटनेत सात जण जखमी झाले आहेत.मनोज जरांगे यांनी गुन्हेगारांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
गावबंदीचं पोस्टर फाडल्याने जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर गावातील दोन गट आपापसात भिडले.मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सूटत नाही तो पर्यंत नेत्यांवर गावबंदी आणावी असे आवाहन जरांगे यांनी केले होते.त्यानुसार, जालन्यातील भोकर तालुक्यातील बोरगाव जहागीर गावात देखील राजकीय नेत्यांना गावबंदी करणारे बॅनर लावण्यात आले.मात्र , या गावबंदीच्या पोस्टरवरून हाणामारी झाली.या घटनेत सात तरुण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच, सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा..
उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!
संयुक्त राष्ट्रांत पहिल्यांदाच भारताचे इस्रायलविरोधात मत!
आयसीसचे काम केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठाच्या सहा जणांना अटक!
आम्ही भारतासोबत एकत्र काम करत राहू!
हे बॅनर गावातील इतर लोकांनी फाडले असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यानुसार, सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यात हा प्रकार कैद झाला होता. त्यामुळे बॅनर का फाडले याबाबत गावातील एका गटाच्या पुढार्याला जाब विचारण्यात आला. त्यानंतर दोन गटात तुंबळ हाणामारीचा प्रकार समोर आला. महत्वाचं म्हणजे या हाणामारीत मध्यस्थी करण्यासाठी गेलेले काही मराठा तरुण आणि सरपंच गंभीर जखमी झाले असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस गावात दाखल झाले आहे.
जरांगे पाटील यांनी या घटनेचा निषेध केला असून पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.या घटनेवर जरांगे म्हणाले, जे कोणी मारहाण करणारे गावगुंड असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. गावगुंडची भाषा आम्हाला शिकवू नयेत. मारहाण करणाऱ्यांसोबतच त्यांच्या नेत्यांना देखील आतमध्ये टाका. गोरगरिबांवर झालेला अन्याय मराठे खपून घेणार नाही. या लोकांना अटक करून आतमध्ये टाकलं नाही, तर आम्ही राज्यभरात आंदोलन करू असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेत कारवाईचे आदेश द्यावे, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.