24 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरक्राईमनामाअर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपतींना जवळून गोळ्या घालण्याचा प्रयत्न

अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपतींना जवळून गोळ्या घालण्याचा प्रयत्न

Google News Follow

Related

अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती क्रिस्टीना फर्नांडीज डी किर्चनर यांच्या हत्येचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. एका व्यक्तीने त्याला जवळून गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक टेलिव्हिजन फुटेजमध्ये या घटनेत उपराष्ट्रपती सुरक्षित असल्याचे दिसून आले आणि गोळीबार होण्यापूर्वी हल्ला अयशस्वी करण्यात आला. हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. क्रिस्टिना २००७-२०१५ पर्यंत अर्जेंटिनाच्या अध्यक्ष होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिस्टीनाच्या घराबाहेर एका व्यक्तीने तिच्याकडे पिस्तूल दाखवले. स्थानिक वेळेनुसार रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना फर्नांडिस यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर ही घटना घडली असे बोलले जात आहे की हल्लेखोराने उपराष्ट्रपतीकडे पिस्तूल दाखवताच तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला मागे ढकलले, त्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हल्लेखोराला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ अटक केली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर मूळचा ब्राझीलचा असल्याचे सांगण्यात येत आहे. देशाचे अर्थमंत्री सर्जियो मासा यांनी या घटनेला हत्येचा प्रयत्न म्हटले आहे.

हे ही वाचा:

गर्भवतीचा मृत्यू झाला आणि पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला

सचिननंतर मुंबईत विराटही सुरू करतोय रेस्टॉरन्ट

बॅनरला विरोध केला म्हणून मनसे कार्यकर्त्याची महिलेला धक्काबु्क्की

मोठा दिलासा, एलपीजी गॅसच्या दरात १०० रुपयांची कपात

फर्नांडो सबाक मॉन्टिएल(३५) असे आरोपीचे नाव आहे. त्याने उपराष्ट्रपती आपल्या घरी परतल्यावर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर ब्राझिलियन असल्याचे स्थानिक मीडियाचे म्हणणे आहे. काही मिनिटांत उपराष्ट्रपतींवर गोळी झाडण्याच्या प्रयत्नाचा व्हिडिओ दाखवण्यात आला. बंदुकीतून गाेळी सुटू न शकल्यामुळे हल्लेखोर गोळीबार करू शकला नाही आणि क्रिस्टीनाचा जीव वाचला अशी माहिती मिळत आहे.

क्रिस्टिना २००७-२०१५ पर्यंत अर्जेंटिनाच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. याविरोधात त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात लोक निदर्शने करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा