एँटी नार्कोटिक्स सेलच्या कांदिवली विभागाने चरस विक्री करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. ही कारवाई दिनांक ८ मार्च रोजी करण्यात आली.
हे ही वाचा:
८ मार्च २०२१ रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास एँटी नार्कोटिक्स सेलच्या कांदिवली विभागातील एचसी गवस यांना खबर मिळाली की नेपाळी गँगचे काही सदस्य बोरिवलीत चरस विक्रीसाठी येणार आहेत.
त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिसांच्या सहाय्याने सापळा रचला. राष्ट्रीय उद्यान, पश्चिम द्रुतगती मार्ग इथे रचलेल्या सापळ्यात काही नेपाळी नागरिकांच्या संशयास्पद हालचालीमुळे त्यांना अटक करण्यात आली. त्याचा तपास केला असता त्याच्याकडे १४.०५६ किलोग्रॅम एवढे चरस हस्तगत करण्यात आले. त्याचा योग्य तो पंचनामा करण्यात आला.
पीएसआय राणे यांनी अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधातील खटला नोंदवून घेतला आहे. प्रबेज महामजन अन्सारी (वय २३ वर्षे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. हा नेपाळमधील बारा जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या चरसची किंमत सुमारे दोन कोटी ऐंशी लाख रुपयांच्या आसपास आहे. अटक करण्यात आलेल्या या तरुणावर विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.