मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून मागील दोन दिवसात पश्चिम उपनगरात दोन ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाईत १२ लाख रुपयांचा ‘एमडी’ हा अमली पदार्थासह ४ जणांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने मागील एका वर्षात २०६ अमली पदार्थ तस्करांना अटक केली असून सुमारे ४८ कोटींचा अमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे.
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे आणि कांदिवली युनिटने शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसात अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात कारवाई करून ४ अमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. वांद्रे युनिटने शनिवारी अंधेरी पश्चिम डोंगरी परिसरातून ३ जणांना ६ लाख रुपये किमतीच्या मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थासह अटक केली आहे. या तिघांकडून ३० ग्रॅम एमडी पोलिसांनी जप्त करून तिघा विरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघे पार्ट्यामध्ये एमडीचा पुरवठा करीत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
हे ही वाचा:
‘मिचॉंग’ने चेन्नईला झोडपलं; ३३ विमाने बंगळूरूकडे वळवली तर १४४ रेल्वे गाड्या रद्द
माऊंट मेरापी ज्वालामुखीचा उद्रेक; ११ गिर्यारोहकांचा मृत्यू, १२ बेपत्ता!
‘सर्व मांसाहार स्टॉल्स तात्काळ बंद करा’, भाजप आमदार महंत बालमुकुंद यांचे अधिकाऱ्यांना आदेश!
दरम्यान कांदिवली युनिटने रविवारी जोगेश्वरी येथून एमडी या अमली पदार्थसह एकाला अटक केली असून त्याच्याजवळून ६ लाख रुपयांचा एमडी जप्त करण्यात आला आहे.या दोन्ही कारवाई मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एकूण १२ लाख रुपयांचा मफेड्रोन हा अमली पदार्थासह ४ जणांसह अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते ३ डिसेंबर २०२३ पर्यत मुंबई शहरासह उपनगरात केलेल्या कारवाईत ९८ गुन्हे दाखल केलेले असून २०६ ड्रग्स विक्रेते आणि तस्करांना अटक करून ४८ कोटींचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ६५ गुन्हे हे एमडी (मफेड्रोन) संदर्भातील असून या त्यात१६८ जणांना अटक करण्यात आलेली असून ३०कोटी रुपयांचा एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.