लाच म्हणून मागितला मोबाईल फोन; महिला पोलीस अधिकारी जाळ्यात

लाचलुचपत विभागाची कारवाई

लाच म्हणून मागितला मोबाईल फोन; महिला पोलीस अधिकारी जाळ्यात

एका आठवड्यात मुंबई पोलीस दलातील दोन पोलिस अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या जाळ्यात अडकले आहे. एकाने दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यासाठी ५० हजाराची लाच मागितली तर दुसऱ्या घटनेत एका महिला अधिकारीने गुन्ह्यात मदत करण्यासाठी अटक आरोपीकडे मोबाईल फोनची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले दोन्ही अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आहेत.

दादर मधील एका रेस्टॉरंट मधील मॅनेजरवर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, या गुन्ह्याचा तपास दादर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक यापदावर कार्यरत असलेले अधिकारी ईश्वर जगदाळे यांच्याकडे देण्यात आला होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि न्यायालयात दोषारोप पत्र तात्काळ सादर करण्यासाठी या गुन्हयात आरोपी असलेल्या मॅनेजरकडे पोलीस उपनिरीक्षक जगदाळे यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल होताच,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ईश्वर जगदाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल. केला.

हे ही वाचा:

पाकला सन्मान द्या, नाहीतर अणुबॉम्ब फोडतील! मणिशंकर अय्यर यांनी दिला फुलटॉस

बडतर्फ केलेल्या सर्व केबिन क्रूला पुन्हा घेतले एअर इंडियाच्या ‘विमाना’त

‘या’ पाच कारणांमुळे सेन्सेक्स गडगडला

दरम्यान आंबोली पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर असणाऱ्या राजश्री शिंत्रे यांना गुरुवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीकडे सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोनची मागणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आंबोली पोलीसानी केबल इंटरनेटचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकाला एका गुन्ह्यात अटक केली होती, या गुन्ह्यात मदत करण्यासाठी राजश्री शिंत्रे यांनी मोबाईल फोनची मागणी केली होती. गुरुवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात राजश्री शिंत्रे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version