30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामामालेगाव प्रकरणातील साक्षीदार म्हणाला, आरएसएस नेत्यांची नावे देण्यास भाग पाडले!

मालेगाव प्रकरणातील साक्षीदार म्हणाला, आरएसएस नेत्यांची नावे देण्यास भाग पाडले!

Google News Follow

Related

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक साक्षीदार पलटला आहे. साक्ष देण्यास नकार देणारा हा १७वा साक्षीदार आहे. या साक्षीदाराने न्यायालयात दावा केला की, त्याला एटीएसने या खटल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) नेत्यांची नावे देण्यास भाग पाडले आहे. दहशतवादविरोधी पथकाने १७ व्या साक्षीदाराचे अपहरण केले आणि त्याला तीन-चार दिवसांच्या बेकायदेशीर कोठडीत ठेवले.

अनेक खंडणी प्रकरणातील आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासादरम्यान एटीएसचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. या प्रकरणात आतापर्यंत २२० साक्षीदार तपासण्यात आले असून त्यापैकी १७ साक्षीदार उलटले आहेत.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, आणखी एका साक्षीदाराने पलटी खाल्ली आणि एटीएसने योगी आदित्यनाथ यांचे नाव घेण्यासाठी दबाव आणल्याचा खळबळजनक खुलासा केला होता. यानंतर आरएसएस नेते इंद्रेश कुमार यांनी मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला होता आणि ‘हिंदू दहशतवाद’ सारख्या खोट्या खटल्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती.

हे ही वाचा:

असा असणार ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’नंतर आता पंतप्रधानांचे लक्ष ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’कडे

धक्कादायक! मृत महिलेच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र!

राहुल यांच्या वक्त्यव्यावर केंद्रीय मंत्र्यांचा हल्लाबोल…

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, माजी गृहमंत्री पी. चिदंबरम, राहुल गांधी, प्रियंका गांधी, दिग्विजय सिंग आणि सलमान खुर्शीद यांसारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी भाजप आणि आरएसएस नेत्यांच्या चारित्र्य हननाबद्दल माफी मागावी, अशी मागणी आरएसएस नेते इंद्रेश कुमार यांनी केली होती.

२९ सप्टेंबर २००८ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास नाशिकच्या मालेगाव शहरातील मशिदीजवळ मोटारसायकलचा स्फोट झाला होता. त्यात सहा जण ठार आणि १०० नागरिक जखमी झाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा