28 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामापरमबीर हाजीर हो! चांदीवाल आयोगाचे आणखी एक समन्स

परमबीर हाजीर हो! चांदीवाल आयोगाचे आणखी एक समन्स

Google News Follow

Related

महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या चांदीवाल आयोगाने पुन्हा एकदा माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना समन्स बजावले. आता परमबीर यांना ६ ऑक्टोबरला आयोगापुढे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या आयोगाने समन्स देऊनही परमबीर हजर राहिलेले नाहीत. परमबीर यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी या आयोगाची नियुक्ती करण्यात आली आहे.पण गेल्या काही महिन्यात अनेकवेळा समन्स पाठवूनही परमबीर या आयोगापुढे उपस्थित राहिलेले नाहीत.

या महिन्याच्या प्रारंभी आयोगाने परमबीर यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावले होते. सिंग यांनी असा दावा केला होता की, देशमुख हे गैरप्रकारात सहभागी होते आणि त्यांनी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला १०० कोटी जमविण्यास सांगितले होते.

गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर यांची याचिका फेटाळली होती. महाराष्ट्र सरकारने लावलेल्या दोन प्राथमिक चौकशी रद्द करावी अशी मागणी परमबीर यांनी न्यायालयात केली होती.

बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्य लाचलुचपत विभागाला परमबीर यांच्याविरोधात आणखी एक चौकशी करण्यास परवानगी दिली होती.

पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी केलेल्या तक्रारीवरून आता परमबीर यांची चौकशी लाचलुचपत विभाग करत आहे. गेल्या वर्षी डांगे हे निलंबित असताना पुन्हा एकदा सेवेत सामावून घेण्यासाठी परमबीर यांनी २ कोटी रुपयांची मागणी केल्याचा डांगे यांचा आरोप आहे.

हे ही वाचा:

जाऊबाई जोरात, मग पोलिसांनी काढली वरात!

…म्हणून जम्मू-काश्मीरमधील सहा कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ

धर्मांतराचे रॅकेट चालवणारा मौलाना कलीम अटकेत

सिंधुदुर्गाहून पहिले विमान ‘या’ तारखेला झेपावणार

अनिल देशमुख यांच्या वकिल अनिता शेखर कॅस्टिरोल यांनी कायदयातील तरतुदीनुसार  वारंवार बोलवूनही परमबीर हजर रहात नसल्याने त्यांची संपत्ती जप्त करावी व अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा