मैदानी चाचणी दरम्यान दुसऱ्या भरती उमेदवाराचा मृत्यु

चारच दिवसात दुसरी घटना

मैदानी चाचणी दरम्यान दुसऱ्या भरती उमेदवाराचा मृत्यु

पोलीस भरती दरम्यान आणखी एका उमेदवाराचा मैदानी चाचणी नंतर मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना मुंबईत उघडकीस आली आहे. गेल्या आठवड्यात कालिना येथे धावण्याच्या चाचणीत कोसळून वाशीम जिल्ह्यातील एका उमेदवाराचा मृत्यु झाला होता, मंगळवारी पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी देऊन   आल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील तरुणाचा फोर्ट येथील हॉटेलमध्ये मृत्यु झाला आहे. या दोन्ही घटने प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अमर अशोक सोलके  हा असे मंगळवारी फोर्ट येथील हॉटेलच्या खोलीत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो २४ वर्षीय असून  अमरावती जिल्ह्यातून मुंबई पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी आला होता. तो सध्या फोर्ट परिसरातली रेसिडन्सी हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. अमर सोलकेने मंगळवारी मैदानी चाचणी दिल्यानंतर तो हॉटेलवर आला होता, दुपारी त्याला खोलीत अस्वस्थ वाटत असल्याचे त्याने परिचीत व्यक्तीला सांगितले होते. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास सोलके हॉटेलमध्ये आंघोळ करत असताना त्याला उलटी झाली व तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हे ही वाचा:

शिंदे आणि ठाकरे गट काय युक्तिवाद करणार ?

शिंदे आणि ठाकरे गट काय युक्तिवाद करणार ?

सोसायटीत खेळणाऱ्या लहानग्याला कुत्र्यांनी चावून मारले

खलिस्तानवाद्यांची भ्याड धमकी; इंदिरा गांधींबाबत जे झाले तसेच अमित शहांच्या बाबतीत होईल!

या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमर सोलके याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलेला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार यांनी दिली.आहे.
मुंबई पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचणीच्या दरम्यान घडलेली हि दुसरी घटना असून या घटनेमुळे भरतीसाठी आलेल्या उमेदवाराच्या कुटुंबामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Exit mobile version