31 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरक्राईमनामाएनआयएकडून पीएफआयच्या आणखी एकास अटक!

एनआयएकडून पीएफआयच्या आणखी एकास अटक!

पिस्तूल, दारुगोळा, तलवार केली जप्त

Google News Follow

Related

राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने पाटणा प्रकरणात पीएफआयच्या आणखी एकाला अटक केली आहे. शहीद रजा असे त्याचे नाव असून तो बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील चकीया भागातील आहे. शाहिदच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल, दारुगोळा, एअर पिस्तूल, एक तलवार आणि दोन चाकू अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ही शस्त्रे त्याला मोहम्मद याकूब खान याने सुरक्षित ठेवण्यासाठी दिली होती, असे एनआयएच्या तपासात निष्पन्न झाले आहे. यापूर्वी एनआयएने १५ आरोपींना अटक केली आहे. शाहिदला मोहम्मद याकूब खान, सुलतान आणि उस्मान यांनी केलेल्या खुलाशाच्या आधारावर अटक करण्यात आली आहे.

या संघटनेशी संबंधित अनेक लेख, कागदपत्रे यापूर्वीच जप्त करण्यात आली आहेत. सांप्रदायिक कथनातून तरुणांना कट्टरपंथी बनवून त्यांचे त्या आधारे प्रबोधन करून देशविरोधी शक्तींच्या इशाऱ्यावर पीएफआय आपली संख्या वाढवत आहे. कट्टरपंथी तरुणांना शस्त्रे, तलवारी आणि लोखंडी रॉड वापरण्यासाठी त्यांच्या ‘शत्रूंवर’ दहशत आणि सूड उगवण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी शस्त्र आणि दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येत असल्याचा अजेंडा एजन्सीच्या तपासणीत उघड झाला आहे.

हे ही वाचा:

‘जगदीश टायटलर यांनी जमावाला उकसवले; पुरेसे शीख मारले गेले नाहीत, असे म्हणाले’

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना नको आहे ‘हिंदीची गुलामगिरी’

शह आणि मात की शह आणि माफ?

ग्रंथालयांचा विकास समाज आणि संस्कृतीशी निगडित

७ जानेवारी २०२३ रोजी एनआयएचे चार आरोपींवर आरोपपत्र केले होते. त्यानंतर ३ ऑगस्ट २०२३ रोजी आणखी चार आरोपींविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. पुरवणी आरोपपत्र एनआयए विशेष न्यायालयात, पाटणा, बिहार येथे दाखल करण्यात आले होते. मोहम्मद बेलाल आणि मो. इर्शाद आलम, जे बंदी घातलेल्या संघटनेच्या विचारसरणीचा प्रसार करण्यात आणि शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा तयार करून गुन्हेगारी कृत्यांचे नियोजन करण्यात गुंतले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा