महिलांना ढकलून देण्याची परंपरा आहे का

रशीद यांच्या फिर्यादीवरून रविवारी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा

महिलांना ढकलून देण्याची परंपरा आहे का

ठाणा कळवा खाडीवरील नवीन पुलाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर झालेल्या धक्काबुक्की प्रकरणानंतर रिदा रशीद यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात रिदा रशीद यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. मी मुख्यमंत्र्यांना भेटायला गाडीच्या बाजूने जात होते. पोलिसांना माहिती दिल्यावर एफआयआर दाखल केला आहे. महिलांना ढकलून देण्याची परंपरा आहे का ?असा सवाल रशीद यांनी केला.

भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा रिदा असगर रशीद यांच्या फिर्यादीवरून रविवारी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रशीद यांनी राष्ट्रवादीचे नेते आव्हाड यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला होता. तक्रारदार रिदा असगर रशीद यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पोलिसांना आव्हाड यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देण्याची विनंती केली

‘मी भाजपची जरी असले, तरी भाजप म्हणून मला कमी लोकं ओळखतात, माझी खरी ओळख एक सामाजिक संस्था चालवणारी महिली, अशी आहे’, असं रीदा राशीद यांनी सांगितलं. मी कुठेही राजकारण करत नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या. घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

हे ही वाचा:

आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस; सर्वसामान्यांचे हाल

आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे ‘अशुद्ध’ ट्विट व्हायरल

टिपू सुलतानाचा पुतळा बसवला तर बाबरी ढाचा सारखी अवस्था करू

जितेंद्र आव्हाड यांनी मला दोन्ही हाताने धरुन पुरुषांवर ढकललं, त्यामुळे मी अवघडले होते. महिलेला ढकलणं योग्य नाही. महिलेला ढकलून बाजुला करणं हीच संस्कृती आहे का? असे सांगून रशीद यांनी आव्हाड यांच्या कृतीचा निषेध केला.  “मुंब्य्रात खूप काही घडले आहे. मी त्याविरोधात आवाज उठवला आहे. आज त्यांचा अपमान केला. त्यांनी मला पकडून बाजूला ढकलले. मी पोलिसात तक्रार दाखल केली… कोणत्याही महिलेसोबत असे होऊ नये. मला आशा आहे की त्यांना लवकरच शिक्षा होईल.”

Exit mobile version