उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात ज्या ठिकाणी आढळून आला होता, त्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह आढळून आला आहे. मुंब्य्रातील खाडी किनारी भागात हा मृतदेह सापडला. मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.
#UPDATE Maharashtra: The body has been identified to be that of a 48-year-old man, Shaikh Saleem Abdul – resident of Retibunder, Mumbra. The body has been handed over to Police officials.
— ANI (@ANI) March 20, 2021
हा मृतदेह ४८ वर्षीय शेख सलीम अब्दुल या व्यतीचा असल्याचे उघड झाले आहे. ही आत्महत्या आहे की, हत्या. घातपात आहे की, अपघात याचा तपास पोलीस करत आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण ताजं असतानाच मुंबईतील नाल्यात आणखी एक मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा:
एनआयएच्या ताब्यातील गाड्यांच्या फॉरेन्सिक तपासणीला सुरूवात
महावितरणाच्या अजब कारभारामुळे पुणे जम्बो कोविड सेंटरमधील बत्ती गुल
एटीएसला मिळणार सचिन वाझेचा ताबा?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्चला सापडला होता. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत घातपात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) काढून राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिला जाण्याची शक्यता आहे. सध्या एनआयए केवळ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करत आहे. तर दहशतवादविरोधी पथक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा तपास करत आहे.